
मुंबईतील काही ठराविक भागांमध्ये सुरुवातीस याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मायानगरी मुंबईला चोवीस तास सुरू ठेवण्याच्या पर्यटन विभागाच्या प्रस्तावाला अखेरीस आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र, "नाइट लाइफ'ची मूळ संकल्पना शिवसेनेला सांस्कृतिकदृष्ट्या पेलवण्यास जड जात असल्याने या प्रस्तावाचे नाव बदलून "मुंबई-24 तास' असे करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुंबईतील काही ठराविक भागांमध्ये सुरुवातीस याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "नाइट लाइफ' हा शब्द आवडत नसल्याची प्रतिक्रिया याआधीच व्यक्त केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मंजुरीला आल्यावर "मुंबई- 24 तास' असे त्याचे नामकरण करण्यात आले. आता 27 जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते.
सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी
सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच मुंबई- 24 तास सुरू ठेवण्याच्या या प्रकल्पामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगार वाढेल असा दावाही त्यांनी केला. तसेच लंडन येथील "नाईट इकॉनॉमी' ही जवळपास 5 अब्ज पौडांची असल्याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
मुंबईत आता काय बदल होणार?
मुंबईत अनिवासी भागातील सर्व थियेटर, मॉल्स, सुरक्षा रक्षक असलेला भाग, नरिमन पॉईंट, काला घोडा, कमला मील बीकेसीमधील एक लेन, अशा भागांतील रेस्टॉरंट्स 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबविला जाणार असून, यामध्ये सहभागी होणारी आस्थापने आणि संस्थांना सुरक्षेच्या उपाययोजना, पार्किंग, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन या नियमांची अंमलबजावणी काटेकोर करणे बंधनकारक असणार आहे.
म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'
पब, बारला सूट नाहीच
आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील नाईट लाईफला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 27 जानेवारीपासून मुंबईतील हॉटेल, मॉल्स 24 तास सुरू राहतील. मात्र पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार आहे. तसेच नाईट लाईफमुळे मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य यांनी केला. नाईट लाईफमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होईल असे ते म्हणाले.
मुंबई खरोखरच 24 तास धावते. इथे नाईट शिफ्टमध्ये काम करणारे असंख्य लोक आहेत. रात्री दहानंतर भूक लागली तर त्यांनी जायचे कुठे? ते शॉपिंग करू शकत नाही, पिक्चर पाहू शकत नाहीत. इथे पुरुष आणि महिला सुरक्षित फिरतात, पर्यटक येतात. मुंबईचा महसूल वाढवायचा असेल तर हे होणे गरजेचे आहे. पुण्याचा विचार करता तिथे आधी आफ्टरनून लाइफ सुरू करायला हवे. - आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री