esakal | दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली मंडई उद्घाटनाअभावी पडून

बोलून बातमी शोधा

wagholi vegetable market
दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली मंडई उद्घाटनाअभावी पडून
sakal_logo
By
टीम सकाळ

वाघोली : सुमारे दीड कोटी रुपये खर्चून दैनंदिन भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी वाघोली बाजार मैदानात मंडई उभारण्यात आली. स्थानिक राजकारणामुळे उदघाटन रखडल्याने ती तशीच पडून असल्याचा आरोप विक्रेते करीत आहेत. 50 पेक्षा अधिक विक्रेते तात्पुरते शेड टाकून मैदानात बसत होते. मात्र तेथे गर्दी होत असल्याने उद्यापासून विक्रेत्यांना तेथे बसण्यास मनाई करण्यात आली आहे. तुम्ही वेगवेगळ्या सोसायटी परिसरात बसा असे त्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान शेडचे उद्या घाईत उद्घाटन करण्याची तयारी सुरू असल्याचे कळते.

पूर्वी दैनंदिन विक्रेते मोकळ्या जागेत शेड टाकून बसत होते. ओट्याचीही सोय नव्हती. मात्र पावसाळ्यात खूपच दलदल होत असल्याने ग्रामपंचायतीने तेथे भव्य शेड उभारून ओटे बांधले. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचे काम पूर्ण होऊन वाघेश्वर भाजी मंडई असे त्याला नाव देण्यात आले. चार महिन्यांपूर्वी या मंडईचे उदघाटन अन्य कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्याच काळात अजित पवार हेही कोरोना बाधित झाले होते. यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रखडला.

हेही वाचा: कामाच्या ठिकाणाजवळ कामगारांच्या लसीकरणास भोसरीमध्ये प्रारंभ

दैनंदिन विक्रेते मोकळ्या जागेत शेड टाकून बसत होते. मात्र सध्या कोरोनाचा कहर झाल्याने व याच ठिकाणी गर्दी होत असल्याने भाजी मंडईचा प्रश्न ऐरणीवर आला. सध्या भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 हीच वेळ असल्याने तसेच विक्रेत्यांची जास्त संख्या यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन लोणीकंद पोलिसानी या विक्रेत्यांचे विभाजन करण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली. तसेच तेथे उद्यापासून विक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली.

''उद्या मंडईचे अगदी साध्या पद्धतीने आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यात विक्रेत्यांना बसविणार आहे ''

- वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली.

हेही वाचा: मुळा-मुठा नदीचे व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर कशासाठी ?

ग्रामपंचायतीचे नियोजन नाही सरपंच

बाजार तळ मैदानातील विक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या विक्रेत्यांना कोठे बसवायचे याचे नियोजन ग्रामपंचायतीने करणे गरजेचे होते. मात्र दुपारी अडीच पर्यंत ते नियोजन झाले नव्हते. भाजी विक्रेत्यांनी वेगवेळ्या सोसायटी परिसरात बसा असे सांगण्यात आले. त्यामुळे बसायचे कोठे या विवंचनेत विक्रेते होते.

...मग शेड कशासाठी

दीड कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या शेड मध्ये अंतर ठेवून काही विक्रेत्यांना बसविले जाऊ शकते. त्यामुळे मध्यवर्ती राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र त्याचे उद्घाटन झाले नसल्याने त्यात बसण्याचे नियोजन करण्यात आले नाही. एवढा खर्च करून शेड उभारले आणि त्यात बसू दिले जात नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल विक्रेत्यांनी केला आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!

आमदार पवार यांच्या हस्ते उदघाटन

या मंडईचे उद्घाटन उद्या ( दि 22 ) आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सुरू होते. ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना या नियोजनाबाबत सांगण्यात आले नसल्याने त्यांनी ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे कळते.

उद्या पासून विक्रेत्यांना बसविणार

उद्या मंडईचे अगदी सध्या पद्धतीने आमदार अधिक पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यात विक्रेत्यांना बसविणार असल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले

दोघांच्या हस्ते उदघाटन

काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आमदार अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके या दोघांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते