esakal | निवडणूक सरली, गरज संपली
sakal

बोलून बातमी शोधा

After vidhan sabha election 2019  situation of activists

जेव्हा-केव्हा नेते भेटतात तेव्हा ते आज-उद्या करीत वेळ मारून नेत असल्याची गाऱ्हाणे कार्यकर्ते गात आहेत. त्यामुळे निवडणूक संपली, गरज संपली, अशीच स्थिती कार्यकर्त्यांची झाल्याचे चित्र आहे.

निवडणूक सरली, गरज संपली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- निवडणूक जाहीर होऊन तिच्या निकालापर्यंत कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून फिरणारे राजकीय पक्षांचे उमेदवार आता मात्र ‘नॉट रिचेबल’ असल्याने कायकर्त्यांची पंचाईत झाली आहे. मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्यापासून प्रचारयंत्रणेतील खर्च हातात पडेनासा झाल्याने कार्यकर्ते नेत्यांच्या दारात चकरा मारत आहेत.

जेव्हा-केव्हा नेते भेटतात तेव्हा ते आज-उद्या करीत वेळ मारून नेत असल्याची गाऱ्हाणे कार्यकर्ते गात आहेत. त्यामुळे निवडणूक संपली, गरज संपली, अशीच स्थिती कार्यकर्त्यांची झाल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रयत्न चालविले होते. कार्यकर्त्यांच्या बळावर मजबूत प्रचारयंत्रणाही उभारली. त्यात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांनी एकप्रकारे हजारी यंत्रणा राबविली होती. त्यानुसार एक हजार मतदारांची जबाबदारी देतानाच संबंधित कार्यकर्त्याला किमान ३० हजार रुपयांचे पाकीट निश्‍चित होते. त्यानुसार वाटप अपेक्षित असल्याचा कार्यकर्त्यांचा सूर होता. त्यातील निम्मीच रक्कम हातावर ठेवून ‘पुन्हा बघू’ असा शब्द दिल्याने कार्यकर्ते कामाला लागले होते. परंतु, निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस झाले, तरी निम्मी रक्कम मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांनी आता तगादा लावला आहे. प्रचारादरम्यान पदरमोड केल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. 

रोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक

विशेषतः पराभूत उमेदवार ‘नॉट रिचेबल’, तर विजयी उमेदवार आज-उद्या करीत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. परिणामी, निवडणूक काळात उत्साहाने राबलेले कार्यकर्ते मात्र आता हैराण झाल्याची तक्रार आहे.

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल