सरकार झुकेपर्यंत आंदोलन - वारीस पठाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

केवळ मुस्लिम समुदाय नव्हे, तर सर्व धर्मांतील लोकांना या जुलमी कायद्याचा धोका आहे. मोदी सरकारने मनमानी कारभार सुरू केला आहे. सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही. हे कायदे रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. प्रसंगी अंगावर गोळ्या झाडल्या, तरी संविधानाला वाचविण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊ.
- वारीस पठाण, माजी अामदार

हडपसर - आमच्या अनेक पिढ्या भारतात राहत आहेत. पण, आता अचानक आपण येथील नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मोदी सरकार केवळ वेगवेगळ्या मार्गाने देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य करीत आहे. मात्र, सरकार झुकेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे प्रतिपादन माजी आमदार वारीस पठाण यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंढवा खुर्द येथील मिठानगरमध्ये सीएए व एनआरसी कायद्याविरोधात महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनात पठाण बोलत होते. १० जानेवारीपासून हे आंदोलन सुरू असून, ते कुल जमात तंजमी या संघटनेच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.

शिवाजी रस्ता बंद केल्याने प्रवाशांचे हाल; पीएमपीलाही 35 लाखांचा फटका

पठाण म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो मुस्लिम शहीद झाले. मात्र, आज या समाजावरच सीएए व एनआरसी कायद्याद्वारे अन्याय केला जात आहे. दोन्ही कायदे संविधान व देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहेत. या कायद्यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against CAA and NRC laws by waris pathan