दूध दरवाढीसाठी 'महाएल्गार' आंदोलन; विरोधी पक्षांनी केल्या 'या' मागण्या!

प्रभाकर गायकवाड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दूध संकलन केंद्रावर दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान व दूध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी मध्य हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व त्याच्या घटक पक्षाच्या वतीने गोमातेचे पूजन करून राज्य सरकारच्या विरोधात शनिवार दि. १ ऑगस्‍ट रोजी मंतरवाडी चौक, उरुळी देवाची येथे महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुनिल कांबळे यांनी केले.

उरुळी देवाची - दूध संकलन केंद्रावर दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान व दूध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी मध्य हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व त्याच्या घटक पक्षाच्या वतीने गोमातेचे पूजन करून राज्य सरकारच्या विरोधात शनिवार दि. १ ऑगस्‍ट रोजी मंतरवाडी चौक, उरुळी देवाची येथे महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुनिल कांबळे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या दुधाला जवळपास १८ ते २० रुपये प्रतिलिटर भाव मिळत असल्याने दूध उत्पादक अडचणीत आला आहे. किमान त्याच्या उत्पादनाचा खर्च भरून काढण्यासाठी प्रतिलिटर ३० रुपये भाव मिळावा, दूध पावडर निर्यातीस प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे. तसेच गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करून दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आमदार कांबळे यांनी केली. चक्रीवादळामुळे शेतकर्‍यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते.

पुन्हा दिसू लागताच 'त्याने' बाळाशी आणि पत्नीशी साधला संवाद; डॉक्टरसुद्धा झाले भावूक

अनेक ठिकाणी सोयाबिन पिकाची पेरणी केली असता बियाणे बनावट निघाल्याने पीक न उगवल्याने दुबार पेरणी करावी लागली, लॉक डाउनच्या काळात भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले, शेतकर्‍यांच्या पिकाला उत्पादनावर अधारित योग्य बाजारभाव नाही. अशा वेळी फक्त सध्या दूधाच्या उत्पन्नावर शेतकर्‍यांचा संसार कसाबसा उभा आहे पण त्याचेही दर गडगडल्याने सर्वत्र नैराश्य पसरले आहे. या नैसर्गिक व कृत्रिम आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे.

यासाठी शासनाने विनाविलंब राजकारण न करता अनुदान रूपातून त्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे, भाजपा मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे, अशोक पुंडे, पांडुरंग रोडे यांनी केली.

यावेळी "शेतकरी एकजुटीचा विजय असो" अशा घोषणा देवून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनात युवा मोर्चा अध्यक्ष सचीन हांडे, कार्याध्यक्ष व्यंकोजी खोपडे, मंगेश जाधव, राहुल शेवाळे, राज पुरोहित, वैशाली पवार, संदिप हरपळे, सूरज बिरे, आकाश पवार, संदिप परदेशी, वैभव ढेकणे, संजय यादव, शिवाजी शेवाळे, महेश भाडळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनावेळी सॅनिटायझरचा वापर करून मास्क व सोशल डिस्‍टन्सचे काटेकोर पालन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation for Milk Rate Increase