esakal | मराठा क्रांती मोर्चा धडकणार राजकीय पक्ष कार्यालयांवर; पुण्यात होणार आक्रोश आंदोलन!
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha_Kranti_Morcha

सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चा धडकणार राजकीय पक्ष कार्यालयांवर; पुण्यात होणार आक्रोश आंदोलन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.27) शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्या वतीने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणेकरांनी थकवले महापालिकेचे १२०० कोटी; माहिती अधिकारातून समोर आली माहिती​

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाग चौकातील कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजता, डेक्कन येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर सव्वाअकरा वाजता आंदोलन होईल, तर जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ भाजप कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आणि शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनसमोर दुपारी साडेबारा वाजता आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणावरील न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि 'सारथी' संस्थेला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेंद्र कुंजीर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top