'मुद्रांक शुल्क' कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत लेखणी बंद

Agitation
Agitation

पुणे - राज्य सरकारकडील विविध प्रलंबित मागण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी आजपासून (ता.1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तरीही मागण्यांची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या लेखणी बंद आंदोलनामुळे शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या करारावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात खोत आणि सचिव सागर पवार यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.

खोत म्हणाले, 'नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी मागील तीन वर्षांपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारकडे प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही या मागण्या तशाच प्रलंबित राहिल्या आहेत. सध्या राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. अशा परिस्थितीत कार्यालयात 30 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा आदेश आहे. तरीसुद्धा 100 टक्के उपस्थितीतील अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू केले नाही. आतापर्यंत या विभागातील 5 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.''

नोंदणीसाठी आवश्‍यक असलेले हार्डवेअर साहित्य आणि अन्य सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे, तुकडे बंदी कायद्यातील तरतुदीनुसार केल्या जाणाऱ्या कारवाया थांबवाव्यात, पदोन्नती देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com