पिंपरीत जीमचालकांचे भर पावसात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी; भाडे माफ करा

पिंपरी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जीम अनलॉकमध्ये सुरू करण्याची परवानगी द्यावी, भाडे माफ करावे, या मागण्यांसाठी चालकांनी भरपावसात मंगळवारी (ता. ४) आंदोलन केले.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

पाच ऑगस्टपासून जीम चालू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा, आम्ही आमचा व्यवसाय चालू करू, असे इशारा जीमचालकांनी दिला आहे. महाराष्ट्र जीम ओनर्स असोसिएशनमार्फत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जीमचालकांनी भर पावसात आंदोलन केले.

संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत जाधव, सहसचिव राजेश इरले, हेमंत बागल, प्रसिद्धिप्रमुख कैलास मोरे, गिरीश जैन यांच्यासोबत सर्व ट्रेनर उपस्थित होते. "व्यायाम करा, कोरोनाशी लढाईची प्रतिकारशक्ती वाढवा', "व्यायाम कराल तरच फिट इंडिया बनवा', "व्यायाम शाळा वाचवा, देश वाचवा' असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते.

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला
 

संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत जाधव यांनी जीम लवकरात लवकर सुरू कराव्यात. भाडे माफ करावे, यासाठी महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जीम चालू करण्याबाबत निवेदन दिले. पाच महिन्यांपासून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. महाराष्ट्रातील पंधरा हजार चालक, मालक, ट्रेनर, हाउस कीपिंग स्टाफ, योगा, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, कंपनीचे कामगार, व्यायामशाळा साहित्य बनवणारे कामगारासंह अनेक पूरक व्यवसायातील कामगार हे पाच महिन्यांपासून बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

जीम व्यावसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. गेली अडीच महिने व्यावसायिकांनी संयमाने नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. परंतु, अनलॉक तीनमध्ये सुद्धा जीमचालकांची निराशा झाली आहे. पाच ऑगस्टपासून जीम चालू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा व्यवसाय चालू करू, त्यातून कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्‌भवल्यास सरकार जबाबदार असेल, असे संघटनेचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation was carried out by the gym drivers in Pimpri