इंदापूरच्या दूधगंगा संघाचा अमूलशी करार 

डाॅ. संदेश शहा
Saturday, 20 June 2020

इंदापूर तालुक्यातील दुधगंगा दूध उत्पादक संघाने गुजरात राज्यातील अमूल या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कंपनीशी पाच वर्षांचा करार केला असून, त्यानुसार दूध संकलन सुरू केले आहे

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील दुधगंगा दूध उत्पादक संघाने गुजरात राज्यातील अमूल या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कंपनीशी पाच वर्षांचा करार केला असून, त्यानुसार दूध संकलन सुरू केले आहे, अशी माहिती माजी सहकारमंत्री तथा दुधगंगा दूध उत्पादक संघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

दौंडच्या लेकीने नाव काढलं, नोकरी सांभाळून झाल्या डीवायएसपी

दुधगंगा दूध उत्पादक संघात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, दुधगंगाने तालुक्यात मोठे आर्थिक परिवर्तन केले, मात्र खाजगी दूध संघ स्पर्धेत आम्ही मागे पडलो. त्यातच शासकीय धोरण देखील बदलल्याने संघ तोट्यात गेला. मात्र, आता 14 गावांतील शेतकरी व अमूल दूध संघाच्या मदतीने हा संघ पुन्हा सुरू झाला आहे. ८ जून रोजी पहिल्या दिवशी 13 हजार लिटर दुध संकलन झाले, मात्र त्यातील 2 हजार लिटर गुणवत्ता नसल्याने स्वीकारले गेले नाही. त्यामुळे दूध गुणवत्ता, फॅट, स्निग्धांश, अँटीबायोटिक तपासणी करून दूध स्वीकारले जात आहे. 

सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा...

शेतकऱ्यांना क्रॉस ब्रीड, इनसेमिनेशन, पशु वैद्यकीय सेवेतून प्रशिक्षण दिले जात असल्याने दूध संकलनात वाढ होणार आहे. अमूलचे 5 अधिकारी या सर्व प्रकियेवर लक्ष ठेवून आहेत. 25 पैकी 14 बल्क कुलर सुरू झाले असून, येत्या 8 दिवसात सर्व बल्ककुलर सुरू होणार आहेत. इंदापूरपासून 10 किलोमीटर परिसरातील शेतकरी थेट इंदापूर डॉकवर दूध आणून घालत असून, कंपनी प्रत्येक महिन्याच्या 3, 13 व 23 तारखेस दूधाचे पेमेंट देत आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे मैदानात

जे दुधाचे सर्वनिकष पूर्ण करतील, त्यांना दूध हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार आहे. शेतकऱ्यांना स्टील कँड, एएमसी मशीन दिले जाणार असून पारदर्शी व काटेकोर कारभारास सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. संघाची दैनंदिन दूध हाताळणी क्षमता 1 लाख लिटर असून सकाळी, रात्री दूध संकलन केले जाणार आहे. केंद्रशासन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत साडेचार कोटी व संघाचे दीड कोटी रुपयातून संघ सुसज्ज करण्यात आला असून चिलिंगसेंटर, पाश्चरायझेशन, फिलपॅक मशीन व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

वा रे पठ्ठ्या शाळेसाठी आणला लाखोंचा निधी

संघ कर्मचाऱ्यांचे व्हीआरएस व ग्रॅज्युएटीचे पैसे देण्यात आले असून, संघाची मालमत्ता 30 ते 35 कोटी रुपयांची आहे. संघावर सध्या एक रुपयांचे कर्ज नाही, मात्र काही शेतकऱ्यांची देणी आहेत. त्यांची सर्व देणी देणार असून या संघामुळे बाजारपेठेस चैतन्य प्राप्त होणार आहे. दुधगंगा दूध संघ पुन्हा सुरू झाल्यामुळे आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या वेळी शेळगावचे राजेंद्र मोहिते, भगवान जाधव, रियाज शेख, गलांडवाडी 1 येथील उत्तम जाधव, बेडशिंग येथील राजेश सुर्वे, उत्तम अवचर, इंदापूरचे अक्षय रासकर या शेतकऱ्यांनी दुधास हमीभावापेक्षा जास्त भाव प्रत्येक 10 दिवसांनी मिळत असल्याचे पावतीसह दाखवून समाधान व्यक्त केले. या वेळी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे उपस्थित होते. संघाचे कार्यकारी संचालक सदानंद कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agreement with Amul of Dudhganga of Indapur