esakal | पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने भात, द्राक्षांचे नुकसान; रब्बी पेरण्या खोळंबल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture-Loss

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी (ता. १४) झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिक आणि ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्षे बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील मळद येथील तलाव फुटला असून याच तालुक्यातील चौघे जण वाहून गेले आहेत. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. याशिवाय रब्बी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने भात, द्राक्षांचे नुकसान; रब्बी पेरण्या खोळंबल्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी (ता. १४) झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिक आणि ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्षे बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील मळद येथील तलाव फुटला असून याच तालुक्यातील चौघे जण वाहून गेले आहेत. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. याशिवाय रब्बी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांची आणि सरकारी कार्यालयांची पडझड झाली आहे. गुरे-ढोरे आणि कुक्कुटपालन शेडमध्ये पाणी घुसल्याने कोंबडीच्या तीन हजार  पिलांचा मृत्यू झाला आहे. नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरल्याने दौंड, बारामती, भोर, वेल्हे  आणि इंदापूर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूरवळील ओरासिटी ओढ्यात चारचाकीसह दोघे जण वाहून. चालले होते. परंतू त्यांना वाचविण्यात यश आले आहे.  

लोहगाव विमानतळावरच आता आरटीपीसीआर चाचणी ! 

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे तीन आरोग्य कर्मचारी पाण्यात अडकले होते. त्यांची १५ तासानंतर सुटका करण्यात यश आले आहे. याच गावातील एक पूल वाहून गेला आहे. दौंड तालुक्यातील राजेगाव-खानवटे रस्त्याने दुचाकीवरून घरी परतणारे चौघे जण वाहून गेले आहेत. यापैकी आज (ता.१५) सायंकाळपर्यंत तिघांचे मृतदेह सापडले आहेत. मळद (ता. दौंड) येथील चार जनावरे वाहून गेले आहेत. 

पावसाने जिल्ह्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले

बारामती तालुक्यातील जिरायती पट्टयात येणाऱ्या कारखेल, अंजनगाव, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, उंडवडी, उंडवडी कडेपठार जोरदार अतिवृष्टी झाली ‌ यामुळे कारखेल येथील शेतकरी कांतीलाल भापकर यांच्या सोनवडी सुपे येथील कुक्कुटपालन शेडमध्ये पाणी घुसल्याने कोंबडीच्या तीन हजार पिलांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा  इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil