esakal | कौतुकास्पद! एकदा, दोनदा नव्हे, चक्क बारा वेळा केला प्लाझ्मा दान
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Munot donate his Plasma Twelfth after recovering from covid 19

प्रथम 26 ऑगस्ट रोजी प्लाझ्मा दान केले. त्यानंतर 9 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 31 डिसेंबर असे सतत प्लाझ्मा दान देण्याचे कार्य मुनोत यांनी केले आहे.

कौतुकास्पद! एकदा, दोनदा नव्हे, चक्क बारा वेळा केला प्लाझ्मा दान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोथरुड : कोथरुड मध्ये राहणारे अजय मुनोत यांनी आजवर सलग अकरावेळा प्लाझ्मा दान केला असून उद्या जागतिक आरोग्य दिनी ते बाराव्यांदा प्लाझ्मा दान करणार आहेत. त्यांच्या या दानशूर वृत्तीचे कौतुक होत आहे.  कोविड काळात प्लाझ्मा दान करणारे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात असताना मुनोत सारखे प्लाझ्मा दाते आपला दानशुरपणा दाखवून इतरांना प्रेरणा देत आहेत. मुनोत हे विपणन सल्लागार म्हणून काम करतात.

प्रथम 26 ऑगस्ट रोजी प्लाझ्मा दान केले. त्यानंतर 9 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 31 डिसेंबर असे सतत प्लाझ्मा दान देण्याचे कार्य मुनोत यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी केलेले प्लाझ्मा दान महिला शक्तीला समर्पित असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शहीद दिनाच्या दिवशी त्यांनी अकराव्यांदा प्लाझ्मा दान केले. 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

कोविड-19 या आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये कोविड-19 या विषाणूविरोधी प्रोटिन तयार होते. हे प्रोटिन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामार्फत, जर एखाद्या कोविड संसर्ग झालेल्या रुग्णास दिला तर हे प्रोटिन कोरोना विषाणूला मारायला मदत करते व रुग्ण लवकर बरा होतो असे तज्ञांचे मत असल्यामुळे प्लाझ्माला मोठी मागणी आहे.

पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; असे असतील नवे निर्बंध

loading image