शहरात लागले 'साहेब', 'दादां'च्या समर्थनार्थ फ्लेक्‍स

Ajit Pawar and Sharad Pawars Supportive Baner in Pimpari
Ajit Pawar and Sharad Pawars Supportive Baner in Pimpari

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 23) सकाळी भारतीय जनता पक्षाला साथ देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याचे पडसाद शहरात उमटू लागले. काहींनी त्यांच्या समर्थनाचे, तर काहींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनाचे फलक लावले. त्यामुळे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी नेमके कोणासोबत, अशी चर्चाही सुरू झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी मात्र शनिवारनंतर (ता. 30) सांगू अशी बचावात्मक भूमिका घेतली आहे.

सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून फेब्रुवारी 2017 पर्यंत साधारणतः 20 वर्षे शहराची सूत्रे शरद पवार (साहेब) व अजित पवार (दादा) यांच्या हातात होती. महापालिकेत एकहाती सत्ता होती. मात्र, 2017 च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता ताब्यात घेतली. 128 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे विरोधी बाकावर त्यांना बसावे लागले. यात काही नगरसेवक साहेबांना मानणारे, तर काही दादांना मानणारे आहेत. भाजपमधील बहुतांश नगरसेवक मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. पक्षाला रामराम ठोकून ते भाजपमध्ये आले आहेत. यात भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे यांचाही समावेश आहे. मात्र, "आम्ही अखेरपर्यंत भाजपमध्येच राहू' असे त्यांनी चार दिवसांपूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

विश्वासघात करणाऱ्यांसोबत लढणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान - सुप्रिया सुळे

या निवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला होता. मात्र, या निवडणुकीला 24 तासही उलटत नाहीत, तोपर्यंत अजित पवार यांनी भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या जोडीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राज्याप्रमाणेच शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. शहरात अनेक ठिकाणी शरद पवार व अजित पवार यांच्या समर्थनाचे फलक लागल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत. 

धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले...

80 वर्षांचे योद्धा 
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसर व रहाटणीतील कोकणे चौकात "आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत' अशा आशयाचे फलक लागले आहेत, त्यावर शरद पवार यांचे छायाचित्र आणि सुनील काटे, संतोष हांडे, गणेश कापसे या कार्यकर्त्यांची नावे आहेत. 

भोंडवेंचे "दादा' व्रत 
राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी स्वतःचे छायाचित्र व नावासह अजित पवार यांच्या समर्थनाचे फलक थेरगाव-डांगे चौक, आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळील इस्कॉन मंदिर परिसर, रावेतमधील भोंडवे कॉर्नर आदी ठिकाणी लावले आहेत. 

दादांविषयी स्तुतिसुमने 
"सोबती सर्वसामान्यांचा, प्रयत्न तुमचा सर्वांना आनंदी ठेवण्याचा', "दादा, तुम्हीच आमचा मान, अभिमान. आपली वाटचाल हाच आमचा स्वाभिमान' आणि "महाराष्ट्राच्या विकासाचा एकच वादा, अजितदादा अजितदादा' असे फलक नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी लावले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com