शॉर्ट सर्किटमुळे फार्महाऊसला लागली आग; अजित पवारांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटावडे येथील फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या कुंडालाला आग लागून नुकसान झाले. ही आग मोठ्या स्वरूपाचे नव्हती, या आगीमध्ये फायबरचे कुंड जळून खाक झाले आहे.

बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटावडे येथील फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या कुंडालाला आग लागून नुकसान झाले. ही आग मोठ्या स्वरूपाचे नव्हती, या आगीमध्ये फायबरचे कुंड जळून खाक झाले आहे.

पाऊस सुरू होता पावसाच्या पाण्यामुळे शॉर्टसर्किट होऊन की आग लागली अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)

मुख्य फार्महाऊसला कोणतेही नुकसान झाले नसून यामध्ये इतर कोणतीही हानी झालेली नाही. समारंभासाठी तयार करण्यात आलेले हे कुंड होते, या कुंडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यामध्ये या कुंडाचे नुकसान झाले आहे, इतर काहीही नुकसान झाले नाही अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्महाऊसला आग

फायबर असल्यामुळे ही आग मोठी वाटत होती व त्याचा धूर वरपर्यंत गेला त्यामुळे आगीचे स्वरूप अधिक असावे असे वाटत होते प्रत्यक्षात ही आग विझवली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असे अजित पवार यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar Clarifies about Farm house fire