पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद; अजित पवारांचा उपरोधिक टोला I Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला - अजित पवार

पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद; अजित पवारांचा उपरोधिक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते पुणे मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुण्याला आले (Pune Tour) आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक (Municipal Election) पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने (BJP) यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन पुणेकरांच्या सहनशीलतेची दाद दिली पाहिजे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना लगावला आहे.

हेही वाचा: '...हे परवडणारं नाही', अजित पवारांनी मोदींसमोरच केली राज्यपालांची तक्रार

यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं. मात्र पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी तब्बल १२ वर्ष लागले आहेत. यासाठी तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो, असे उद्देशून ते पुणेकरांना म्हणाले आहेत. आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागणार आहे. मेट्रोच्या ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली आहे त्यामुळे मी पुणेकरांच्या (Pune) सहनशीलतेला मी मानतो असा टोमणा त्यांनी लगावला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मोदींचे आभार मानले आहेत.

दरम्यान, राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेल्या टोलेबाजी आणि वक्तव्यावरून त्यांनी पंतप्रधान यांच्याकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्राच्या (Maharahstra) भूमित अनेक महान व्यक्तीमत्वांनी जन्म घेतला असून भाजपा नेत्यांकडून त्यांचा वारंवार अपमान होत असल्याचेही त्यांनी मोदी यांना सांगितले आहे.

हेही वाचा: PM Modi In Pune Live: PM मोदींनी मराठीमध्ये केली भाषणाला सुरुवात

Web Title: Ajit Pawar Criticize Bjp On 12 Year Project Of Metro Delay In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..