esakal | ...म्हणून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. यात कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

...म्हणून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सूरज यादव

पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलं. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अद्यापही काही जणांना गांभीर्य आलेले नाही, मास्क घालत नाहीत, नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. यात कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी पुण्यातील 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे'ला (सारथी) भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अजित पवार म्हणाले की, लोकांना त्रास होईल पण रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांनी हा लॉकडाऊन असणार आहे. तो कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल. लोकांना काही गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. 

हे वाचा - पुण्यात पुन्हा लॉकडाउन; वाचा 5 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन कऱण्यात आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊनमध्ये नियोजन चुकलं असंही म्हटलं जात होतं. त्याबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की, अनेक देशांमध्ये पुन्हा लाकडाऊन लागू करावं लागलं आहे. कोरोना रुग्णांचा वाढता वेग पाहता असे निर्णय घेतले गेले. याचा अर्थ पहिलं लॉकडाऊन चुकलंय असा होत नाही. 

कोणत्या सुविधा सुरू राहणार?
पुण्यातील दहा दिवसांचा लॉकडाउन कडकडीत असणार आहे. त्याकाळात पहिल्या पाच दिवसांत भाजीपाला आणि किराणा दुकाने बंद असतील. केवळ दूध आणि मेडिकल स्टोअर्स तसेच दवाखाने सुरू असतील, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अत्यावश्यक वस्तूंची खरेदी?
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना दोन दिवसांचा अवधी दिला आहे. येत्या दोन दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी लागणार आहे. कारण लॉकडाउन काळात भाजी, किराणा मिळणार नसल्याने नागरिकांना दोन दिवसांत, पुढील दहा दिवसांसाठी लागणारे किराणा साहित्य खरेदी करायचे आहे.

सारथी अॅपबद्दल विचारले असता अजित पवार यांनी सांगितलं की, सारथीला छत्रपती शाहू महाराजांचे नाव आहे. त्याला शोभेल असं काम व्हायला हवं. सारथीच्या कामकाजाची आणि सारथीकडून होणाऱ्या खर्चाची माहिती लोकांना त्या त्या वेळी समजायली हवी असंही अजित पवार यांनी सांगितलं. 

आणखी वाचा - पुण्याच्या महापौरांना मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

महापालिकांना आर्थिक मदत
मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक यासह सर्वच महापालिकांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे, त्यांना मदत करावी लागणार आहे. तसेच लाॅकडाऊन च्या काळात सरकारने शेतकर्यांचे ८ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, असे पवार यांनी सांगितले.