मुख्यमंत्र्यांकडून महापौर मोहोळ यांना शाबासकी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

पुणेकरांसाठी गेली साडेतीन चार महिने रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या महापौरांना कोरोना होताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

पुणे : पुणेकरांसाठी गेली साडेतीन चार महिने रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या महापौरांना कोरोना होताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पुणेकरांसाठी आपण लढलात झटलात असे सांगत उध्दव ठाकरे यांनी महापौर मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले आणि शाबासकी दिली. खासगी रुग्णालयातील उचारानंतर महापौर गुरुवारी रात्री घरी गेले.

‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र...

९ मार्चला कोरोनो पुण्यात शिरकाव केला. तेव्हापासून पुणेकरांच्या सुरक्षेसाठी महापौर मोहोळ हे झटून काम करत होते.  त्यांच्या या कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. दरम्यान, महापौर मोहोळ यांच्यावर कोरोनाने हल्ला केला. त्यामुळे ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोहोळ यांची विचारपूस केली. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महापौर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली.  

पुण्यात आता 'ही' सरकारी यंत्रणा होणार सुरु; ग्राहकांना मिळणार दिलासा    

कोरोनापासून पुणेकरांचा बचाव व्हावा यासाठी मोहोळ यांनी आरोग्य यंत्रणांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा आवाका वाढतच राहिल्याने सगळ्या यंत्रणा तोकड्या ठरण्याची भिती होती. तरीही कोरोनाचा अटकाव करण्यासाठी महापौर मोहोळ हे रस्त्यावर उतरुन स्वत: उपाययोजना आखत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray inquired about the health of Mayor Murlidhar Mohol