Ajit Pawar |Ajit Pawar: मविआ सरकार पडताच अजित पवारांचं घड्याळ चुकलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar
मविआ सरकार पडताच अजित पवारांचं घड्याळ चुकलं?

Ajit Pawar: मविआ सरकार पडताच अजित पवारांचं घड्याळ चुकलं?

माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कायमच चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या वक्तशीरपणामुळे भल्याभल्यांची झोपच उडाली होती. पण हाच वक्तशीरपणा आता सरकार पडल्यावर कुठे गेला? असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. (Ajit Pawar in Pune)

हेही वाचा: पुणे : मंत्रीमंडळाचा विस्तार करायला का घाबरता- अजित पवार

अजित पवार आज एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. प्रत्येक कार्यक्रमाला अगदी वेळेवर किंबहुना वेळेच्या थोडं आधीच पोहोचतात. अनेक नेत्यांनीही त्यांच्या या वक्तशीरपणाची प्रशंसा केली आहे. पण आज पुण्यातल्या एका कार्यक्रमाला मात्र अजित पवार उशीरा पोहोचले आहेत. एखाद-दुसरा मिनिट नव्हे तर तब्बल एक तास उशिरा अजित पवार कार्यक्रमासाठी पोहोचले आहे.

हेही वाचा: आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री...अजित पवार गोंधळले,VIDEO

त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे अजित पवार (Ajit Pawar) सरकार पडल्यावर निवांत झालेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. आता अजित पवारांना उशीर होण्यामागे काही कारण आहे की खरंचच थोडा निवांतपणा आलाय, हे पुढच्या कार्यक्रमांच्या वेळा पाहूनच कळेल.

Web Title: Ajit Pawar Leader Of Opposition Mahavikas Aghadi Government Being Late For A Programme In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..