पुणे : झेडपीत भाकरी फिरणार; नव्या चेहऱ्याला संधी? अध्यक्षपदासाठी 'या' सात तालुक्‍यात स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

  • नव्या चेहऱ्यांना संधीची मागणी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडताना नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत, किमान जिल्हा परिषदेत तरी भाकरी फिरवा, अशी मागणी झेडपीतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरुण सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पवार झेडपीत भाकरी फिरवणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सात तालुक्‍यांतील सदस्यांनी अध्यक्ष पदावर संधी देण्याची मागणी केल्याने, या तालुक्‍यांमध्येच अध्यक्षांसाठी रस्सीखेच असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची येत्या शनिवारी (ता.11) निवड केली जाणार आहे. त्यामुळे अजित पवार हे येत्या शुक्रवारी (ता.10) इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर तरुण आणि नव्या चेहऱ्यांनी भाकरी फिरविण्याची आणि पक्षाचा आमदार नसलेल्या तालुक्‍यांना प्राधान्याने संधी देण्याची मागणी केली आहे.

मध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने अजित पवार ठरवतील, तोच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी असणार आहेत. मात्र याआधी जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केलेल्या सदस्यांनी अनुभवाचा मुद्दा पुढे करत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. यामुळे तरुण सदस्य कोणालाही दुसऱ्यांदा संधी देऊ नका, अशी मागणी मुलाखतीच्यावेळी पवार यांच्याकडे करणार आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत बारामती, इंदापूर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ आणि हवेली या सात तालुक्‍यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात घसरण; पाहा आजचे भाव

मात्र विद्यमान अध्यक्ष बारामती तालुक्‍यातील आहेत. शिवाय आंबेगाव आणि इंदापूर या तालुक्‍यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे पदाधिकारी पदांच्या स्पर्धेतून हे तीन तालुके बाद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पुरंदर आणि वेल्हे तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही सदस्य नसल्याने हे दोन तालुके आपोआप स्पर्धेतून बाद झाले आहेत. उपाध्यक्षांसाठी बारा, बांधकाम सभापतीसाठी दहा, कृषीसाठी सहा, सामाजिक न्यायसाठी पाच आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीसाठी चार सदस्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. अनेकांनी किमान हे नाही तर ते, असे एखादे पद मिळेल, या आशेने तीन ते चार पदांसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी पक्षाकडे स्वतंत्र मागणी अर्ज केले आहेत. त्यानुसार 42 सदस्यांनी 55 इच्छा अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

एकावेळी पाच पदांची इच्छा
दरम्यान, खेड तालुक्‍यातील एका महिला जिल्हा परिषद सदस्याने तब्बल पाच पदांसाठी इच्छा व्यक्त केली आहे. या सदस्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम समिती, कृषी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदांवर काम करण्यासाठीचे पाच स्वतंत्र इच्छा अर्ज सादर केले आहेत. हे किंवा ते, किमान एक तरी पद मिळेल, या आशेने हे अर्ज केले असावेत, असा अंदाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar may be chance new face in Pune ZP