बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजित पवारांनी कायमचा संपवला!

Ajit Pawar Solved Baramatikar drinking water problem forever
Ajit Pawar Solved Baramatikar drinking water problem forever

बारामती : आगामी तीस वर्षात बारामती शहराच्या लोकसंख्येत होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन बारामतीत तीन नवीन साठवण तलाव उभारले जाणार आहेत. या तिन्ही साठवण तलावांचे काम पूर्ण झाल्यानंतर बारामती शहराची पिण्याच्या पाण्याची साठवण क्षमता वाढीव लोकसंख्येचा विचार करता 53 दिवसांनी अतिरिक्त वाढणार आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा नीरा डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असतो. दरवर्षी उन्हाळ्यात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्यावर बारामतीला दोन किंवा तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. हे दुखणे कायमचे संपवून टाकण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सध्याच्या दोन साठवण तलावांव्यतिरिक्त घारे इस्टेट, तांदुळवाडी व जळोची येथे तीन नवीन साठवण तलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

घारे इस्टेट 190,  तांदुळवाडी 250 तर जळोचीच्या साठवण तलावाची  क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल. या पैकी घारे इस्टेट तलावाचे काम सध्या वेगाने सुरु असून लवकरच उर्वरित दोन्ही तलावांची कामेही मार्गी लागणार आहेत. सध्या बारामतीतील दोन्ही साठवण तलावांची क्षमता 483 दशलक्ष लिटर्स इतकी आहे. नव्या साठवण तलावाची क्षमता 620 द.ल. लिटर्स इतकी असेल. दोन्ही मिळून बारामती नगरपालिकेची साठवण क्षमता 1103 द.ल. लिटर्स इतकी होईल. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

या तिन्ही तलावांचे काम होण्यासाठी 2023 साल उजाडेल असा प्राथमिक अंदाज आहे. 2023 ते 2038 आणि 2038 ते 2053 असा आगामी 30 वर्षांचा विचार व वाढणारी अंदाजे लोकसंख्या गृहीत धरुन हा प्रकल्प अजित पवार यांनी हाती घेतला आहे. आगामी काळात नगरपालिकेचा वाढलेला विस्तार व शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता दैनंदिन 25 दशलक्ष लिटर्स दररोज पाणी लागेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यातही बारामतीला सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याचे अजित पवार यांचे स्वप्न आहे. त्याचा विचार करता सर्व साठवण तलावांचे काम पूर्ण झाल्यानंतर 53 दिवस पुरेल इतका पाणीसाठा या सर्व तलावात असेल. 

‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

 बारामतीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात....
या सर्व साठवण तलावांच्या निर्मितीमागे बारामतीकरांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, हाच अजित पवार यांचा उद्देश आहे. आगामी 30 वर्षांचा विचार करुन हे नियोजन झालेले आहे
- सचिन सातव, गटनेते, बा.न.प. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com