पुण्यातील चुकलेल्या उड्डाणपुलांचं करायचं काय? अजित पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

अजित पवार म्हणाले, 'विद्यापीठ चौकातील एक दोन उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याचं अनेकांचं म्हणणं आहे, त्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिथे मेट्रोचा पर्याय देखील विचारात घेता येऊ शकतो.' 'झोपू'च्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो, असे सांगताना या कार्यालयाला 12 लाखांचं भाडं हे लक्षात ठेवा, असा टालो अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना लगावला. 

पुणे : पुणे शहरातील चुकलेल्या उड्डाणपुलांच्या बाबतीत काही तरी निर्णय घ्यावाच लागले, असं मत आज, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातील चुकलेल्या उड्डाण पुलाचा संदर्भ दिला. तिथं मेट्रोचा पर्याय विचारात घेता येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. 

पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; दहा लाखांच्या खंडणीची मागणी

अजित पवार म्हणाले, 'विद्यापीठ चौकातील एक दोन उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याचं अनेकांचं म्हणणं आहे, त्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिथे मेट्रोचा पर्याय देखील विचारात घेता येऊ शकतो.' 'झोपू'च्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो, असे सांगताना या कार्यालयाला 12 लाखांचं भाडं हे लक्षात ठेवा, असा टालो अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना लगावला. 

अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकजण जखमी

चुकलेले उड्डाणपूल पाडणार?
अजित पवार यांच्या उड्डाणपुलाविषयीच्या वक्तव्यामुळं वेगळी चर्चा सुरू झालीय. शहरातील चुकलेले उड्डाणपूल पाडले जाणार, अशी चर्चा सुरू झाली. मुळात अजित पवार यांनी आज तसे संकेत दिल्याचे मानले जात आहे. या सगळ्यात विद्यापीठ चौकातील चुकलेल्या उड्डाणपुलाची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यामुळं तो उ्डडाणपूल पाडून दुरुस्त केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण, कोट्यवधी रुपये खर्च करून, हे चुकीचे पूल बांधलेच कसे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; रॅलीला परवानगी नाकारली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Speaks About wrong flyover of Pune