पूरग्रस्तांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; सणसर येथील पाहणीत अजित पवारांच्या सुचना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर जात असताना सणसर(ता.इंदापूर) येथे पूरामुळे नुकसान झालेल्या ओढ्यालगतच्या परीसराची पाहणी केली. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक रणजीत निंबाळकर, यजुवेंद्र निंबाळकर, विक्रम निंबाळकर, सागर भोईटे, श्रीनिवास कदम, पार्थ निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, जगदीश निंबाळकर, यशवंत पाटील , मुस्तफा सय्यद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

वालचंदनगर - पूर व पावसाळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर जात असताना सणसर(ता.इंदापूर) येथे पूरामुळे नुकसान झालेल्या ओढ्यालगतच्या परीसराची पाहणी केली. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक रणजीत निंबाळकर, यजुवेंद्र निंबाळकर, विक्रम निंबाळकर, सागर भोईटे, श्रीनिवास कदम, पार्थ निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, जगदीश निंबाळकर, यशवंत पाटील , मुस्तफा सय्यद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई मिळावी : आमदार कुल

शिंदेवाडी येथील तलाव फुटल्यामुळे सणसर च्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होत. सध्या तलावातील व परीसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील माती सणसर कटच्या कालव्यामध्ये आली आहे. यावेळी पवार यांनी सांगितले की,  तलाव फुटून कालव्यात आलेली माती व कालव्याची स्वच्छता तातडीने करुन घ्यावी.यासाठी जलसंपदा विभागाला तात्काळ मशनरी उपलब्द करुन देण्याच्या सुचना दिल्या. मुसळधार पाऊस व पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा.  तसेच  ओढ्याच्या परीसरातील अतिक्रमणामुळे पाणी नागरिकांच्या घरात घुसले असून अतिक्रमण हटविण्याची  सुचना पवार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिली.

'फी'न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखताय? शिक्षण विभागाचा शाळांना कडक इशारा

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar suggestions flood affected survey at Sansar