esakal | पोलिसांचे काम असे तर, बाकीच्यांचे काय ? अजित पवारांनी ठेकेदाराला झापले
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचे काम असे तर, बाकीच्यांचे काय ? अजित पवारांनी ठेकेदाराला झापले

पोलिसांचे काम असे तर, बाकीच्यांचे काय ? अजित पवारांनी ठेकेदाराला झापले

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे, : "चांगले काम बघायला बोलवा.कामाच्या पाहणीला बोलावले तर मी बारकाईने काम बघतो. या ठेकेदाराने पोलिसांचेच काम असे केले आहे, तर बाकीच्याचे काय ? माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा- छु काम आहे." अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस मुख्यालयातील कामाची पाहणी करताना नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिस व ठेकेदाराची कानउघडणी केली. (ajit pawar visit pune police headquarters police commissioner Amitabh Gupta)

शहर पोलिस मुख्यालयातील कामांचा आढावा पवार यांनी घेत सूचना केल्या. त्यानंतर बिनतारी संदेश विभागाच्या इमारतीच्या व अन्य कामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास केली. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: पुरंदर विमानतळासाठी बारामतीतील ३, पुरंदरची ५ गावे

आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार, उपमुख्यमंत्री पवार हे शुक्रवारी सकाळी सात वाजताच पोलिस मुख्यालयात पोचले. त्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयाच्या आवारात सुरु बिनतारी संदेश विभागाच्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. पाहणी करतानाच पवार यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

कामाच्या दर्जावरुन पवार पोलिस अधिकारी व ठेकेदारावर चांगलेच भडकले. "चांगलं काम बघायला बोलवा. अरे शहाण्या असं काय काम आहे. पोलिसांचं कामच असे असते. मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा- छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलय तर बाकीच्यांचे काय ?" अशा शब्दात पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच सुनावले.

हेही वाचा: बारामतीत आता प्रशासनच लोकांकडे जाऊन करणार स्वॅब तपासणी