हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी मंत्री भरणेंच्या वडिलांनी मारला होता शेतात फेरफटका

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी मंत्री भरणेंच्या वडिलांनी मारला होता शेतात फेरफटका

वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राजकीय वारसा नाही, भरणे कुंटुबाची शेतकरी फॅमिली म्हणून फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये ओळख आहे. दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा रामा भरणे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. विठोबा भरणे हे हाडामासाचे शेतकरी होते. शेतीमध्ये काबाडकष्ट करुन, घाम गाळून शेती पिकविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. कष्टाच्या जोरावर त्यांनी शेकडो एकर शेतीचे मळे बहरवले. शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांनी शेतीवर प्रेम केले. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्यांनी आदल्या दिवशीही शेतामधून फेरफटका मारला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकाच वेळी शेकडो एकर उसाच लागवड करुन ऊस व्यवस्थापन करण्याची त्यांची पद्धत अफलातून होती. पारंपारिक शेतीबरोबर त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. त्यांना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्याची आवड होती. पारंपारिक उसाबरोबर द्राक्ष शेती करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला. तसेच परीसरातील शेतकऱ्यांनाही द्राक्ष शेतीसाठी प्राेत्साहन दिले. स्वत:च शेती करीत असताना त्यांनी आजूबाजूच्या परीसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देण्याचे काम शेवटपर्यंत अविरतपणे केले.

प्रामाणिकपणे शेती व्यवसाय करुनही कुंटुबाची आर्थिक प्रगती होवू शकते हे कृती दाखवून दिले. परीसरातील शेतकऱ्यांना शेती फायदेशीर असल्याचा संदेश दिला. मुलगा दत्तात्रेय झेडपी अध्यक्ष झाले. नंतर आमदार व राज्यमंत्री झाले. मात्र तात्यांनी मुलगा मंत्री असल्याचा रुबाब कधीही गाजवला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मातीशी असलेले नाळ कधीही तुटली नाही. 

कडक शिस्तीचे तात्या...
विठोबा भरणे हे परीसराध्ये तात्या या नावाने ओळखले जात होते. तात्या हे सुरवातीपासून कडक शिस्तीचे होते. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनाही कडक शिस्तीचा नियम लागू होता. जसे ते कडक शिस्तीचे होते. तसाच त्यांचा स्वभाव ही प्रेमळ होता. कुंटुबातील मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम करीत होते.

आज बुधवार (ता. ३०) रोजी दुपारी सव्वाबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे ज्येष्ठ बंधू रामचंद्र भरणे यांनी विठोबा भरणे यांना अग्नी दिला. यावेळी बंधू मधुकर, आबासाहेब व कुंटुबातील नागरिक उपस्थित होते.

अंत्यविधीसाठी पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी अंतविधीसाठी गर्दी केली होती. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथ माने, दौंडचे आमदार राहुल कुल, करमाळ्याचे संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, रामहरी रुपनवर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, झेडपीचे माजी सभापती प्रवीण माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सेक्रेटरी अशोक मोरे, राजेंद्र काळे, बाळासाहेब गावडे, प्रतापराव पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले सांत्वन-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास भरणेवाडीमध्ये भरणे कुंटूबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com