अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

निलेश बोरुडे
Wednesday, 2 December 2020

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती पुणे यांची एकत्रित बैठक एक डिसेंबर रोजी पार पडली. या वेळी सदर मोर्चाबाबत निर्णय घेण्यात आला.

किरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

उद्या 3 डिसेंबर रोजी सकाळी 10:45 वाजल्यापासून शनिवार वाडा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांची या मोर्चासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. ओबीसी आरक्षणा विरोधात न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेचा निषेध म्हणून तसेच ओबीसी समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती पुणे यांची एकत्रित बैठक एक डिसेंबर रोजी पार पडली. या वेळी सदर मोर्चाबाबत निर्णय घेण्यात आला.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, भाजपा ओबीसी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक योगेश ससाने, गणेश कळमकर, डॉक्टर प्रल्हाद वडगावकर, मृणाल ढोले पाटील, मंगेश ससाने, प्रितेश गवळी, विठ्ठल सातव, वाणी समाज अध्यक्ष माधुरी देव, साळी समाजाचे नेते महेश भागवत, माजी नगरसेवक दयानंद इरकल, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काशीद, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष नांगरे, नंदकुमार गोसावी, मिलिंद वालवडकर, धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad's morcha at the Collector's office tomorrow