
देशात प्रथमच एका शास्त्रज्ञाला एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा
मान मिळाला असावा. आकाशाशी जडले नाते, व्हायरस, माझे विश्र्व, अंतराळ आणि
विज्ञान, यक्षांची देणगी आदी साहित्तिक लिखाण प्रा. नारळीकर यांनी केले.
पुणे Pune News : मराठी भाषा अलीकडच्या काळात टिकून राहिली पाहिजे. त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती व्हावी म्हणून, नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे.
यासाठी प्रयत्न करणार असून, विज्ञान मराठीत आले की भाषा अधिक समृद्ध
होईल. वैज्ञानिक आणि साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल,
अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान लेखक प्रा.
जयंत नारळीकर यांनी ‘सकाळ' शी बोलताना दिली. नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची
घोषणा करण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशात प्रथमच एका शास्त्रज्ञाला एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा
मान मिळाला असावा. आकाशाशी जडले नाते, व्हायरस, माझे विश्र्व, अंतराळ आणि
विज्ञान, यक्षांची देणगी आदी साहित्तिक लिखाण प्रा. नारळीकर यांनी केले
आहे. अध्यक्षपदाची घोषणा झाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘माझ्यासाठी हा मोठा सन्मान असून, त्यासाठी आपण योग्य ठरू यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’ अलीकडच्या काळात मराठी टिकून रहावीयासाठी प्रयत्न करणे जास्त गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी सर्वांनी एक त्र येत प्रयत्न करावे माझ्या कार्यकाळात मी त्यासाठी कटिबद्ध असेल असेही ते म्हणाले.
डॉ. नारळीकरांचे जीवन
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील,
रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील
बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती
विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. जयंत नारळीकरांचे शालेय
शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी
(B.Sc.) प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे
त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही
पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे
मिळाली. १९६६ मध्ये नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ)
ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२
साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन
संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद
स्वीकारले. १९८८ मध्ये त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून
नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या 'नभात हसते तारे’ या
पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. 'पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी
स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
आणखी वाचा - पुतीन यांच्या एका व्हिडिओने रशियात खळबळ
डॉ. नारळीकरांचे संशोधन
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी
थिअरी’ मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी
क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा
कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी
गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते
उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.