Indapur : महाविकास आघाडीच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन; घातला सरकारचा दहावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन; घातला सरकारचा दहावा

महाविकास आघाडीच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन; घातला सरकारचा दहावा

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे, त्यांना चांगला पगार द्यावा तसेच इतर मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासाठी एस टी च्या ३९ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या देखील झाल्या तरी या सरकारला जाग येत नाही. शासनानेआंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने इंदापूर एस. टी आगरासमोर राज्यातील तिघाडी सरकारचा दहावा घालून दशक्रिया विधी करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ अनेक जणांनी मुंडण करत शासनास जागे करण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवन घोगरे,पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.

हेही वाचा: 30 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला किमान एक डोस - टोपे

यावेळी पवन घोगरे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागाची एस टी ही जीवन वाहिनी असून त्यामुळे दळणवळण सुलभ होते. एस टी मुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात येणे जाणे, जेष्ठ लोकांना इंदापुरात औषधो पचारासाठी येणे जाणे सोपे पडते. मात्र सुरक्षित वाहतूक करणाऱ्या कामगारांच्या संपा मुळे एस टी सेवा बंद आहे. राज्य कर्जात असताना देखील आमदार निधीत भरघोस वाढ करणारे शासन आम जनतेच्या सोयी साठी कामगारांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे ३९ कामगारांनी आत्महत्या केल्या. त्यास जबाबदार धरून शासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार पासून सुरू

यावेळी निवास शेळके, तालुकाध्यक्ष सचिन देवकर, तालुका कार्याध्यक्ष भारत जामदार, प्रीतम लावंड, सचिन जाधव, काशिनाथ अनपट, सरडेवाडी तंटामुक्त अध्यक्ष प्रशांत सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचेसंचालक सुभाष दिवसे, जिल्हा सरचिटणीस सचिन सावंत,अशोक मगर, महेंद्र काळे, चंद्रकांत शेरकर, रामहरी जाधव उपस्थित होते.

loading image
go to top