मातंग समाजाचा आरक्षणासाठी ‘आक्रोश’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासोबतच अण्णा भाऊ साठे महामंडळ सुरू करावे, यांसह इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

पुणे - मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासोबतच अण्णा भाऊ साठे महामंडळ सुरू करावे, यांसह इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

राज्यात मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणाबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे. राज्य सरकार मातंग समाजाबाबत विरोधी भूमिका घेत आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह ‘बार्टी’च्या धर्तीवर मातंग समाजासाठी ‘आर्टी’ची स्थापना करावी, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, अण्णा भाऊ साठे महामंडळ सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न केल्यास दलित महासंघातर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकटे यांनी दिला.

Serum Institute Fire:सीरमच्या आगीनंतर संभाजी ब्रिगेडचं पत्रक; 5 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या आंदोलनात महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, नगरसेविका स्वाती लोखंडे, उपाध्यक्ष लक्ष्मी पवार, शहराध्यक्ष जयंत जाधव, अशोक लोखंडे, मनोज अडागळे, विकास भोंडवे, खंडू पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, महिला व युवक सहभागी झाले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akrosh Agitation for reservation of Matang community