
एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलवर मद्यपीचे फोटो काढले. हा प्रकार मद्यपीला सहन झाला नाही.
पुणे : तुम्ही मद्यपी दारुच्या दुकानाबाहेर रांगेत थांबले म्हणून त्यांची चेष्टा करत असाल, मोबाइलवर त्यांचे फोटो काढत असाल, तर जरा ऐका.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एक मद्यपी दारुच्या बाटल्या घेऊन येत असताना त्याचे एकाने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले. त्यामुळे मद्यपीची 'सटकली' आणि त्याने मोबाइलवर फोटो काढणाऱ्याला चांगलेच बदडले, तसेच त्याच्यावर धारदार हत्याराने वारही केले. त्यामुळे आता मद्यपीची छेड काढण्याचा चूकुनही प्रयत्न करु नका!
सरकारने दारू घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर लाखो मद्यपीच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी भल्या पहाटेच वाईन शॉपीबाहेर सरकारच्या आदेशाप्रमाने 'सामाजिक अंतर' ठेवून पुरेसा मद्यसाठा खरेदी करुन आणला. अशाच पद्धतीने एक जण दारुच्या दुकानातून दारूच्या बाटल्या विकत घेऊन आपल्या 'स्टाईल'ने येत होता.
- पुण्यात पेट्रोल-डिझेल बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवीन आदेश; काय ते वाचा
त्यावेळी एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलवर मद्यपीचे फोटो काढले. हा प्रकार मद्यपीला सहन झाला नाही. त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत मोबाईलवर फोटो काढणाऱ्यास जोरदार बडवले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले.
- पुणेकरांसाठी मोठी बातमी : दुकानांच्या वेळांबाबत पुन्हा नवीन आदेश
मंगळवारी (ता.५) सायंकाळी साडे सात वाजता ही घटना अप्पर इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी भूषण गरुड (वय 39, रा.सुपर, इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाड़ी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून चौघाविरुद्ध बिबवेवाड़ी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरूड यांनी एकजण दारूच्या बाटल्या घेऊन येत असताना मोबाइलवर त्याचा फोटो काढला होता. त्यानंतर मद्यपीनी त्यांच्यावर हल्ला केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा