Video : कोरोना काळातील पुणे पोलिसांच्या कार्याने उद्योगपती झाला प्रभावित; ५० लाखांचा दिला मदतनिधी!

Pune_Police_Commissioner_Industrialist_Pusalkar
Pune_Police_Commissioner_Industrialist_Pusalkar

पुणे : कोरोनाच्या कठीन काळात जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणाऱ्या पोलीसांबाबत कृतज्ञता आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील उद्योगपती आणि इंडो शॉट्‌ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी. पुसाळकर यांनी 50 लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलीस दल कल्याणसाठी दिला. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.

यावेळी, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हाणे, पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पुणे शहर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे, पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पौर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

पुसाळकर म्हणाले, ''देशामध्ये कोरोनामुळे 'न भूतो, न भविष्यती' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अवघड आणि कठीण प्रसंगातही पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या या कायार्साठी ही छोटीशी मदत आणि त्याचबरोबर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाच मुलींची पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या ट्रस्टतर्फे घेतली जाणार आहे.''

डॉ. के. व्यंकटेशम्‌ म्हणाले, ''समाजातील सजग नागरिक हा सुद्धा एक पोलिसच असतो. विविध सामाजिक आपत्तींमध्ये पोलिस दल सर्तक राहून नागरिकांचे रक्षण करत असतात. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या
उद्योगपतींकडून मिळालेल्या या निधीचा पोलिस दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com