पुणे महापालिकेने उभारलेल्या डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये 'या' आहेत सुविधा

dedicated hospital.jpg
dedicated hospital.jpg

बालेवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, तसेच खासगी हॉस्पिटलकडून आकारण्यात येणारी अवाच्या सव्वा बिल, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत सुविधा देणारे महापालिकेचे पहिले स्वतंत्र डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलच बाणेर येथे सुरू होत आहे. बाणेर येथील सर्व्हे नंबर 109 येथे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. 

अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. महापालिकेचे हे पहिलेच स्वतंत्र असे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असून येथे स्वॅब कलेक्‍शनपासून ते आयसीयू बेडपर्यंतची सर्व सुविधा उपलब्ध आहे. पाच एकर जागेवर 4250 चौमीवर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये कोविड पेशंटसाठी आवश्‍यक सुविधा व वैद्यकीय उपकरणे ही सीएसआर अंतर्गत पुरविण्यात आली आहेत. या ठिकाणी 270 ऑक्‍सिजन बेड्‌स, 44 आयसीयू बेड्‌स असे 314 बेडचे हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे.

 महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर वेगळे वॉर्डही तयार करण्यात आले आहेत. येथे ऑक्‍सिजनसाठी लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजन टॅंक 13000 लिटर क्षमतेचा बसविला असून, ऑक्‍सिजन सिलेंडर, मॅनिफोल्ड त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्‍यूम पंप यांची व्यवस्थाही केलेली आहे. तसेच विजेच्या बॅकअपसाठी आयसीयूचा यूपीएस व जनरेटर सुविधाही केलेली आहे.

आयसीयूसाठी आवश्‍यक मॉनिटर, व्हेंटिलेटर, हाय फ्लो नोझल, एक्‍स-रे मशिन, ईसीजी मशिन तसेच इतर वैद्यकीय उपकरणे, खाटा, गाद्या, बेडशीट, ब्लॅंकेट लागणारे साहित्य उपलब्ध केलेले आहे. इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सर्व सुविधा करण्यासाठी पंचशील फाउंडेशन, एबीआयएल फाउंडेशन, माइंडस्पेस बिझनेस पार्क प्रा. लि., मालपाणी ग्रुप संगमनेर, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांनी मदत केली आहे. महापालिकेने हॉस्पिटल चालविण्यासाठी भाकरे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा. लि. या एजन्सीची नेमणूक केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून हे हॉस्पिटल रुग्णांसाठी सुरू होणार असल्याची घोषणा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. उद्‌घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या हॉस्पिटलच्या अद्ययावत सुविधांचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com