नव्वदीतल्या 'त्या' चार आजींनी हरवले कोरोनाला; वाचा त्यांना हे कसे शक्य झालं

गजेंद्र बडे
Wednesday, 5 August 2020

कोरोना हा काही गंभीर आजार नाही. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोरोनाला कोणीही सहज हरवू शकतो, हे ऐंशी-नव्वदीतील वयाच्या चार आजींनी दाखवून दिले आहे.

पुणे : कोरोना हा काही गंभीर आजार नाही. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोरोनाला कोणीही सहज हरवू शकतो, हे ऐंशी-नव्वदीतील वयाच्या चार आजींनी दाखवून दिले आहे. या चारही आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यातून कोरोना हा सर्वसामान्य आजारांसारखाच एक आजार नसून तो पुर्णपणे बरा होतो, हाच संदेश मिळाला आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने विप्रोच्या सहकार्याने बालेवाडी येथे सुरू करण्यात कोवीड रुग्णालयात या चार आजींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या चौघींना उपचारानंतर मंगळवारी (ता.४) सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

यापैकी दोन आजी या वेल्हे तालुक्यातील वांजळे येथील, एक आजी भोर तालुक्यातील उत्रौली तर एक आजी या पुणे शहरातील दापोडी येथील आहेत. या चारपैकी तिघी जणी ८० वर्षे तर, एक आजी ९० वर्षे वयाच्या आहेत.

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला 

बालेवाडी येथील हे विप्रो रुग्णालय १४ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात पहिल्या दिवशी पाच रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर या चारही आजींना २५ जुलैला कोरोनावरील उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

दरम्यान, या चारही आजीवर दहा दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्या चौघीही कोरोनातून पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे विप्रो रुग्णालयाचे उप अधीक्ष डॉ. बालाजी लकडे यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All four grandmothers tested negative for corona