उद्या भारत बंद; पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा राहणार... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी शहरासह जिल्हयातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.

पुणे : देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या (ता. 8) संपाला शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्याचा पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. सर्व शाळा सुरू राहणार आहे, असे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

उद्या देशात बंद पण, राज्यातील शाळा मात्र....
 

पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी शहरासह जिल्हयातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड म्हणाले, "आमची संघटना बंदमध्ये सहभागी नाही. सर्व मुख्याध्यापक नियमितपणे शाळेवर हजर असतील. शाळाही सुरू राहतील.'' महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळचे सचिव शिवाजी खांडेकर म्हणाले, "संपाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही संपात सहभागी होणार नाही.'' 

एका दिवसात पीएमपी झाली मालामाल; गाठला 2 कोटींचा टप्पा 
 

शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला असला, तरी संपात सहभाग घेणार नसल्याने पुण्यातील सर्व शाळा सुरूच राहणार आहेत. राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशीही "सकाळ'ने याबाबत संपर्क साधला. ते म्हणाले, "कामगार संघटनांच्या बंदमध्ये संपूर्ण सहभागाचे पत्र शिक्षक वा कर्मचारी संघटनांकडून संचालनालयाकडे आलेले नाही. त्यामुळे शाळा बंद राहण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पुण्यासह राज्यात उद्या नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहतील.''

Video : पुण्यात अभविप कार्यालयाच्या नामफलकाला फासले काळे

जनता शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले, की ''आमच्या संघटनेने या "बंद'ला पाठिंबा दिला आहे. परंतु कोणीही कामावर गैरहजर राहणार नाही, तर काळ्या फिती लावून काम करणार आहेत.''

Video : शनिवारवाड्यात आले मस्तानीचे वंशज: पाहा कोण आहेत ते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All schools in the district and city of Pune will continue