पुणे : मार्केट यार्डातील सर्व विभाग लवकरच होणार सुरू

market-yard.jpg
market-yard.jpg

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग रविवार (ता.३१)पासून सुरू होणार आहेत. एक अडत्या एक वाहन या धोरणात्मक निर्णयासह बाजारात विविध उपाययोजना करून मार्केट यार्ड सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बि जे.देशमुख यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले मार्केट यार्डातील सर्व विभाग सुरू होणार आहेत. गुरुवारी बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांच्या उपस्थितीत अडते, हमाल, तोलणार, टम्पो चालक पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

दरम्यान, या बैठकीत योग्य ती खबरदारी घेवून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपसचिव सतीश कोंडे, विभाग प्रमुख बाबा बिबवे, दत्तात्रय कळंमकर, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष राजेंद्र कोरपे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, टेम्पो चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, एक अडत्या एक वाहन याप्रमाणे रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत शेतीमाल घेवुन येणा-या वाहनास बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बाजार आवारातील गाळ्याच्या बर्हिगोल पाकळीची बाहेरच्या बाजुचे गाळेधारक अडते रविवार (ता. ३१) तर आतील बाजूचे अडते सोमवार (ता. १) पासून पुढील प्रत्येक दिवशी दिवसाआड पद्धतीने व्यापार करतील. शेतीमाल गाळ्यावर खाली झाल्यानंतर रिकामे वाहन बाजार आवाराच्या बाहेर काढण्यात येणार आहेत. शेतीमाल घेवुन जाणारी वाहने दुपारी १२ वाजलेनंतर बाजार आवाराचे बाहेर काढण्यात येणार आहेत. सर्व अडते , शेतकरी व इतर बाजार घटकांनी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांचे समन्वयाने शेतीमालाची विक्री केली जाणार आहे.

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!

असे आहे नियोजन.....
- शेतीमाल विक्रीची वेळ पहाटे पाच ते दुपारी १२ पर्यंत
-  अडते, कामगार यांना ओळखपत्र तपासुन गेट क्र. १ व गेट क्र. ४ ने प्रवेश देण्यात येणार
-  खरेदीदार व टेम्पो वाहनांना गेट क्र. ४ मधुन ओळखपत्र तपासुन प्रवेश 
-  बाजार आवारात विक्रीकरिता शेतीमाल घेवुन येताना तो क्रेट व गोणीमध्ये आणण्याच्या शेतकऱ्यांना सूचना
- मोकळ्या मालास बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही.( उदा . कलिंगड , टरबुज , पपई , मोसंबी , संत्रा इत्यादी ) 
- बाजार आवारात मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक
- अनुज्ञप्तिधारी अडत्यासच शेतीमालाची विक्री करता येईल
- बाजारात रिकामी वाहने आढळल्यास दंडात्मक कारवाई त्यांना बाजार आवारात कायम स्वरुपी प्रवेश बंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com