आजपासून सर्व दुकाने सुरू; असे आहेत नवे नियम

Pune
Punee sakal

पुणे - कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri - Chinchwad) महापालिका प्रशासनाने पुणेकरांना सुखद धक्का दिला. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवस तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. त्यामुळे शहराचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दहा दिवसानंतर कोरोनाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे आणि पिंपरीत दोन महिन्यांपासून कडक निर्बंध लावले होते. या काळात केवळ वैद्यकीय सेवा व अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू होती. परंतु, कोरोनाची लाट ओसरत असताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार दोन्ही महापालिकांनी सोमवारी आदेश जाहीर केले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यावेळी सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती सदस्य हेमंत रासने उपस्थित होते.
शहरातील व्यावसायिक, व्यापारी, कष्टकरी यांच्याकडून लॉकडाउन न वाढविण्याची मागणी केली जात होती, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेने नियम शिथिल केले आहेत.

Pune
राज्यात जिल्ह्यांनुसार वेगवेगळे निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली

मद्य विक्री सर्व दिवस
शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवसातच सुरू करण्याची परवानगी आहे. मात्र, मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत खुली राहणार आहेत.

मॉल, उद्याने बंद
शहरातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी मॉलमध्ये एकाच वेळी जास्त लोक एकत्र येऊन कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मॉलमधील दुकाने बंदच राहणार आहेत. तसेच उद्याने, जीम, नाट्यगृह, चित्रपटगृह, स्पा, राजकीय व सामाजिक कार्यालये बंद राहणार आहेत.

पीएमपीची सेवा बंद
शहरातील व्यवहार सुरू राहणार असले तरी पीएमपी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपी सेवा सुरू राहणार आहे.

Pune
दिलासादायक; राज्यात दिवसभरात 15 हजार रुग्ण; 184 मृत्यू

असे आहेत नवे नियम
- अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत खुली राहणार.
- अत्यावश्‍यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी राहणार.
- दुपारी ३ नंतर संचारबंदी लागू होईल, केवळ वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येईल.
- बी-बियाणे, खते, उपकरणे ही कृषी दुकाने व संबंधित आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली असतील.
- हॉटेल व रेस्टॉरंट बंद असतील; पण पार्सल सेवा सुरू राहणार.
- ई-कॉमर्समधून अत्यावश्यक सेवेसह इतर सेवा, वस्तूंची खरेदी व घरपोच सेवा सुरू होणार.
- महापालिका क्षेत्रातील सर्व बॅंका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.
- शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील.

Pune
'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे व संयमामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळेच महापालिकेने पुन्हा एकदा ‘अनलॉक’च्या दिशेने पाऊल टाकले आहे. यामध्ये शहरातील व्यावसायिक, कष्टकरी यांना दिलासा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात अत्यावश्यक सेवेत नसलेली सलून व ब्युटीपार्लरसह सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. १० दिवसांनी पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील. - मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com