कोरोना चाचणीवरून भाजप-राष्ट्रवादीत आरोपप्रत्यारोप

पुणे महापालिकेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहा असा आयत्यावेळी निरोप महापौर कार्यालयातून दिला.
NCP vs BJP
NCP vs BJPesakal
Summary

पुणे महापालिकेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहा असा आयत्यावेळी निरोप महापौर कार्यालयातून दिला.

पुणे - पुणे महापालिकेत केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कार्यक्रमात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) केल्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहा असा आयत्यावेळी निरोप महापौर कार्यालयातून दिला, त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसल्याचा आरोप विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ (Dipali Dhumal) यांनी केला. तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पलटवार करत त्यांच्याच पक्षाने कार्यक्रमाला उपस्थित राहू नका असा निरोप धुमाळ यांना दिल्याने त्या खोटे बोलत असल्याची टीका केली.

महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दीपाली धुमाळ, काँग्रेस, शिवसेनेचे गटनेतेही अनुपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या फ्लेक्सवर महापुरूषांचे फोटो नसल्याने आरोपप्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते.

NCP vs BJP
व्याजाच्या पैशांवरुन तरुणाचे अपहरण; जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

शहा यांच्या कार्यक्रमाचा पास आज मिळाल्यानंतर महापौर कार्यालयातून आरटीपीसीआरचा अहवाल घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहा असे सांगण्यात आले. आयत्यावेळी हा अहवाल मिळत नाही हे माहिती असूनही असा निरोप दिला. विरोधकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये यासाठी हे गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘शहा यांचा दौरा असताना राष्ट्रवादीतर्फे आंदोलन केले जाणार होते, त्यामुळे धुमाळ यांना व्यासपीठावर येता येणार नव्हते. त्यामुळे त्या आता खोटे बोलत आहेत. आम्ही त्यांच्यासह त्यांच्या नेत्यांना मान सन्मान दिला होता, खुर्ची सुद्धा ठेवली होती.

शहा यांची भेट म्हणजे पराभवाची कबुली

भाजपचे दोन क्रमांकाचे नेते अमित शहा हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात बोलवावे लागले ही भाजपच्या पराभवाची कबुलीच आहे. गेल्या पाच वर्षात भाजपला एकाही मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करता आले नाही.भाजपचा कारभार पुणेकरांना पाहिला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com