व्याजाच्या पैशांवरुन तरुणाचे अपहरण; जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी 50 लाख रुपयांची खंडणी किंवा पाच एकर शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी तरुणाचे अपहरण करून टोळक्‍याने त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
crime
crimecrime
Summary

व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी 50 लाख रुपयांची खंडणी किंवा पाच एकर शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी तरुणाचे अपहरण करून टोळक्‍याने त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे - व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी 50 लाख रुपयांची खंडणी (Ransom) किंवा पाच एकर शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी तरुणाचे अपहरण (Youth Kidnapping) करून टोळक्‍याने (Gang) त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तरुणाची सुटका करून सहा जणांना बेड्या ठोकल्या.

अनिल लक्ष्मण हगवणे (वय 33, रा.संभाजीनगर, धनकवडी), किरण सोपान भिलारे (वय 35) विशाल अनिल जगताप (वय 22, रा. भिलारेवाडी, कात्रज), संदिप चंद्रकांत पोखरकर (वय 24, रा. धनकवडी), अभिजीत दत्तात्रय देशमुख (वय 29, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), मनोज ज्ञानेश्‍वर भरगुडे (वय 32, रा.आंबेगाव पठार, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा पुर्वी शिरुर व भिगवण येथील लिलावातील वाळु विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यानंतर तो कात्रज येथील भिलारेवाडी येथे राहण्यास आला. त्यावेळी त्याची किरण भिलारेमार्फत अनिल हगवणे याच्याशी ओळख झाली. दरम्यान, फिर्यादीस नवीन ट्रक घेण्यासाठी व वाळु ट्रकवरील दंडाची रक्कम भरण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे फिर्यादीने हगवणेकडून दरमहा 10 टक्के व्याजाने 15 लाख रुपये, तर भिलारेकडून पाच लाख रुपये घेतले.

crime
अमित शहा यांचेकडून हर्षवर्धन पाटील यांचे सहकारातील महत्व अधोरेखित

त्यानंतर काही महिने फिर्यादीने दोघांना व्याजाची रक्कम नियमीत दिली. मात्र कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीनंतर फिर्यादीस वाळूच्या व्यवसायात नुकसान झाल्याने वेळेत व्याजाची रक्कम देता आली नाही. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबींना जीवे मारण्याची धमकी देत पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर आरोपींनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या शिरुरमधील टाकळी हाजीजवळच्या म्हसे बुद्रुक येथील घरून जबरदस्तीने गाडीत बसवून धनकवडी येथील शंकर महाराज मठामध्ये आणले. तेथे रंजित ऊर्फ बापू पायगुडे याने फिर्यादीस हाताने व लाकडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या कुटुंबीयांकडे 50 लाख रुपये किंवा पाच एकर शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले.

दरम्यान, याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलिस नाईक रमेश चौधर व पोलिस शिपाई अमर पवार यांना मिळाली. त्यांनी खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता शंकर महाराज मठाच्या परिसरात पोचले. तेथुन त्यांनी फिर्यादीचा शोध घेऊन आरोपींना अटक केली. त्यानंतर संबंधित प्रकरण पुढील कारवाईसाठी शिरुर पोलिसांकडे देण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बुवा, पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस कर्मचारी यशवंत ओंबासे,रविंद्र फुलपगारे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का ?

आरोपींचा मित्र असलेला मनोज भरगुडे हा पुणे पोलिस दलात कार्यरत आहे. तो सध्या पोलिस मुख्यालयात नेमणुकीला आहे. त्यानेही फिर्यादीला मारहाण करुन धमकी दिली होती. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. आता त्याच्या व आरोपींच्या संबंधाची चौकशी करुन, वरिष्ठांकडून त्याच्यावर खात्याअंतर्गत कारवाई होणार, असा प्रश्‍नचिन्ह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com