Corona Virus : घाबरलेल्या कोरोनाग्रस्तांचे 'डॉक्टर' वाढवतायेत मनोबल'; उपचाराबरोबरच देतायेत धीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

"एक दिवस १२ तास, तर एक दिवस २४ तास अशी कामाची विभागणी केली आहे. कोरोनाग्रस्तांबरोबरच आपल्या उपचार गटातील अन्य डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी अशा सगळ्या गटाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो,"असे डॉ. खलाटे यांनी सांगितले. ते म्हणाले,"कोरोनाचे रुग्णसमोर येत आहेत. पण तरी लक्षणे दिसुनही ते चार-पाच दिवस घरातच राहिले तर त्यांच्या घरातील सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात जाणे महत्त्वाचे आहे."​

पुणे : "कोरोनाग्रस्त सुरुवातीला खूप घाबरलेले असतात. अशा रुग्णांना आपल्या संवादातून धीर देणे महत्वाचे असते. उपचारादरम्यान रुग्णांमध्ये सकारात्मक वृत्ती सातत्याने राहावी यासाठी समुपदेशन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या रुग्णांवर शास्त्रोक्त वैद्यकीय उपचारांबरोबरच संवादातून धीर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.," अशा शब्दात डॉ. किरण खलाटे यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुळचे बारामतीमधील असणारे डॉ. खलाटे यांनी सुरवातीला दहा वर्ष रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात काम पाहिले. आता ते गेल्या तीन वर्षापासून औंध जिल्हा रुग्णालयात फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते कोरोनाग्रस्तांवर प्रत्यक्ष उपचार करत आहेत. दररोज या रुग्णांचा रक्तदाब, श्वसननलिका अशा विविध तपासणी करण्याची जबाबदारी डॉ. खलाटे यांच्याकडे आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

"एक दिवस १२ तास, तर एक दिवस २४ तास अशी कामाची विभागणी केली आहे. कोरोनाग्रस्तांबरोबरच आपल्या उपचार गटातील अन्य डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी अशा सगळ्या गटाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो,"असे डॉ. खलाटे यांनी सांगितले. ते म्हणाले,"कोरोनाचे रुग्णसमोर येत आहेत. पण तरी लक्षणे दिसुनही ते चार-पाच दिवस घरातच राहिले तर त्यांच्या घरातील सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात जाणे महत्त्वाचे आहे."

एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोना अन्...
"कोरोना आपल्या दारात आला असून आता त्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात येऊ द्यायचे नाही. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये. पण ताप, सर्दी, खोकला येत असेल किंवा दम लागत असेल, तर जवळच्या दवाखान्यात जा आणि वेळीच उपचार करा. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे."
- डॉ. किरण खलाटे, फिजीशियन, जिल्हा रुग्णालय, औंध

Coronavirus : नायडू, ससूनला 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी हे महत्त्वाचे :
- रुग्णालय, पोलिस, प्रशाकीय यंत्रणा आणि नागरिकांचे टीम वर्क
- कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देणे आणि त्यांचे समुपदेशन करणे
- नागरिकांनी स्वत: बरोबरच इतरांची काळजी घेणे
- सोशल डिस्टनन्सी आणि संबंधित नियमाचे पालन करणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Along with the treatment of corona disease doctors does counselling to the patient