esakal | आंबेगाव तालुक्यात 52 पॉझिटिव्ह 2 जणांचा मृत्यू; मंचरवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ambegaon 52 corona positive 2 deaths Manchar Lockdowna

शहरातील अनेक उच्चभ्रू राहत असलेल्या सोसायट्यांमध्ये कोरोनानेने शिरकाव केल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडीच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरातही पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याची चर्चा व्यापारी वर्गात सुरू झाली आहे.

आंबेगाव तालुक्यात 52 पॉझिटिव्ह 2 जणांचा मृत्यू; मंचरवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार

sakal_logo
By
डी.के वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाची लागण थांबता थांबेना. सोमवारी 52 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 846 झाली आहे. मंचर शहरात सर्वाधिक 27 रुग्ण आढळून आले आहेत. मंचर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 274 झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील अनेक उच्चभ्रू राहत असलेल्या सोसायट्यांमध्ये कोरोनानेने शिरकाव केल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडीच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरातही पुन्हा लॉक डाऊन ची टांगती तलवार असल्याची चर्चा व्यापारी वर्गात सुरू झाली आहे. मंगळवारी दुपारी व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन प्रशासनाने केल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. या बैठकीत होणार्‍या निर्णयाकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यात मेट्रो पुल पडल्याची अफवा; प्रत्यक्ष स्थिती कशी आहे पाहा व्हिडिओ

गिरवली सात , का नसे  पाच, कळ ब तीन,अवसरी बुद्रुक एक, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, खडकी प्रत्येकी दोन, पेठ, अवसरी बुद्रुक, लोणी, म्हाळूंगे पडवळ, अवसरी खुर्द, नारोडी, प्रत्येकी एक. तालुक्यात आतापर्यंत19 जणांचा मृत्यू झाला आहे. 487 रुग्णांना बरे होऊन घरी सोडले आहे. 340 रुग्णांवर मंचर उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल व अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

''मंचर शहरात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला आहे. नागरिक पूर्वीसारखे गांभीर्याने हा आजार घेत नाहीत. प्रमाणित मास्क वापरत नाहीत. त्यामुळे करुणा चा उद्रेक वाढल्याची माहिती ती नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरने दिली.'' प्रशासनाने कठोर पावले उचलून कोरोनाचा होणारा शिरकाव थांबवावा. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मंचर ग्रामपंचायती वरही ही प्रशासक लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागणार आहे. 

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

loading image
go to top