esakal | आंबेगाव, शिरूरमधील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

बोलून बातमी शोधा

dilip walse patil
आंबेगाव, शिरूरमधील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत आंबेगाव व शिरूर विधानसभा मतदारसंघातील ४३ कामांना पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी दिली.

आंबेगाव तालुका -१० लाख रुपये - गवारवाडी ते गुणवणे रस्ता सुधारणा , पारगाव तर्फे खेड ते गंगावाडी रस्ता (मधुरा डेअरीमार्गे) सुधारणा, घोडेगाव तिवलदरावस्ती रस्त्याची सुधारणा, शिनोली भैरवनाथ चौक पायरा घाट रस्ता कॉंक्रिटीकरण, मंचर निघोटमळा ते लांडकमळा रस्ता सुधारणा, खडकी हद्दीतील खडकी नागापूर रस्ता ते गणेश नगर कॅनॉल मार्गे, जाणारा रस्ता सुधारणा, जाधववाडी गावठाण अंतर्गत काँक्रिटीकरण, नांदूर गावठाण काँक्रिटीकरण, धोंडमळा ते घोडेगाव रस्ता डांबरीकरण, घोडेगाव येथे चावडी स्मशानभूमी रस्त्याची सुधारणा,साल गावातील बाभूळवाडी इंगलवेलवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे, नारोडी पालखी रस्त्याची सुधारणा करणे, शिंगवे येथे पिंपरखेड रोड ते सारणी रस्त्याची सुधारणा करणे, पोंदेवाडी येथे बेल्हा जेजुरी रस्ता ते वायाळ वस्ती रस्त्याची सुधारणा, पाच लाख रुपये - चिंचोली कोकणे रोकडेवाडी रस्त्याची सुधारणा, पेठ येथे कुरवंडी रस्ता ते गुंजाळवस्ती अंतर्गत रस्त्याची सुधारणा, आठ लाख रुपये - मंचर मुळेवाडी शिवनेरी सोसायटी गाडे हॉस्पिटल ते भीमाशंकर सोसायटी रस्त्याची सुधारणा, आंबेगाव गावठाण ते जलशुद्धीकरण प्रकल्प बसवणे. बहुउद्देशीय सभागृह- माळीण, वाळूंजमळा- कळमजाई माता मंदिरासमोर, जारकरवाडी - ढोबळेवाडी वडजादेवी मंदिर, अवसरी बुद्रुक- घाटीमळा पांडुरंग मंदिरासमोर, पहाडदरा दशक्रिया घाट येथे शेड बांधकाम , शिरदाळे येथील दशक्रिया शेड, (सर्वे १० लाख रुपये), अवसरी खुर्द दशक्रिया घाट येथे शेड (१५ लाख). रानमळा येथे एसटी बस थांबा बांधणे (सात लाख रुपये), आंबेगाव गावठाण ते जलशुद्धीकरण प्रकल्प बसवणे (आठ लाख).

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

शिरूर तालुका-10 लाख रुपये : मलठण गावठाण ते बोडरे वस्ती रस्ता सुधारणा, गणेगाव खालसा ते नवगिरे वस्ती रस्त्याची सुधारणा. १५ लाख रुपये : निमगाव धुळे ते ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणी, केंदूर येथील सुक्रेवाडी पर्हाडवाडी रस्ता ते शेळकेवाडी महादेव मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची सुधारणा, प्रजिमा 115 मुखई ते पलांडे वस्ती रस्ता, कान्हूर मेसाई ते ननवरे वस्ती रस्ता. २० लाख रुपये : बुरुंगवाडी गाव अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, जांबुत गावठाण ते कावळ पिंपरी रस्त्याची सुधारणा करणे. २५ लाख रुपये : जातेगाव बुद्रुक येथे ग्राम क्रीडांगणाची सुधारणा करणे, भराडी हद्दीतील भराडी थापलिंग रस्ता ते मुक्ताई मंदिराकडे जाणारा भराडी शिवेवरील नवीन रस्ता, सात लाख रुपये : सविंदणे कीठेवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे. सामाजिक सभागृह बांधकाम : १० लाख रुपये :कवठे दत्त मंदिरासमोर, स्मशानभूमी परिसर सुधारणा:- केंदुर प-हाडवाडी (१० लाख रुपये), खैरेनगर (१५ लाख रुपये), पाबळ (२० लाख रुपये), पिंपळे खालसा (१५ लाख रुपये).

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर