esakal | आंबेगाव : 18 ठिकाणी दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आंबेगाव : 18 ठिकाणी दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव (ता. आंबेगाव) : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6 गावात 18 ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून मुद्देमाल लंपास केला. यात 4 लाख रूपये रोख रक्कम व दागिने चोरीला गेले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी प्रभावीपणे चोरींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. लवकरच या चोरांना ताब्यात घेऊ असे सांगितले. यात 4 ठिकाणी जबर चोरी झाल्याचे दिसून आले. धोंडमाळ येथील राणुजी सिताराम वायकर यांच्या घरात चोरी होऊन रोख रक्कम 70 हजार रूपये व 6 तोळे दागिऩे

हेही वाचा: इंदापूर : समर्थकांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा

चोरीला गेले. तसेच राजाराम सतुजी काळे व पारूबाई लक्ष्मण पवार यांच्या घरात रात्री चोरी झाली. गोहे बुद्रुक येथे गोविंद ठकुजी भवारी यांच्या घरात 1 तोळे मंगळसुत्र, डिंभे बुद्रुक येथे सुलोचना दत्तात्रय आमुंडकर, विलास मनाजी डोंगरे यांच्या घरात चोरी झाली परंतु हाती काहीही लागले नाही. कानसे येथील बाबुराव शंकर आमुंडकर, संजीवनी मोहन येवले यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चोरांच्या हाती काहीही मिळाले नाही. शिनोली येथे विलास नारायण बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर सदाशिव बोऱ्हाडे, रामदास बबन बोऱ्हाडे यांच्या घरात काहीही मिळाले नाही. पिंपळगाव घोडे येथील युसुफ हफिज पटेल यांच्या घरात 2 तोळे वजनाचे मंगळसुत्र, अंगठी, कानातले असे एकूण 3 तोळे चोरीला गेले. प्रभाकर दशरथ जोशी 10 हजार रूपये रोख रक्कम चोरीला गेली. तर मारूती देवजी लाडके, कैलास दत्तात्रय लाडके, शिवाजी सखाराम नाईक, संगिता नारायण ढमढेरे, नारायण एकनाथ जोशी, संगिता रामदास ढमढेरे, दिलीप अनंतराव ढमढेरे यांच्या घरात चोरी होऊनही हाती काहीही लागले नाही.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी दरोडा पडल्यामुळे परिसरातील नागरिक भयभयीत झाले आहे. पोलीसांना कळाल्यानंतर याठिकाणी जाऊन पंचनामे करण्यात आले. पुण्यावरून डॉगस कॉड व ठसे तज्ञ मागविण्यात आले होते. चोरीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक गावातील सीसीटीव्ही मध्ये 6 चोर दिसले. ग्रामस्थांनीही 6 चोर असल्याचे पोलीसांना सांगितले. चोरांनी या घरांमध्ये चोरी करताना आजूबाजूच्या घरांना कड्या लावल्या होत्या. या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले, सीसीटीव्हीचे पाहणी केली असता हे दरोडे एकाच टीमकडून झाल्याचे दिसते. प्रभावी यंत्रणांचा वापर करून आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू. पहाटे 2 वाजता काही ग्रामस्थांनी काही दुचाकी स्वार चोरांना पाहिले होते. परंतु त्यांनी पोलीस ठाण्याला न कळविल्यामुळे पुढील घटना घडल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, अतिश काळे करीत आहे.

loading image
go to top