esakal | रुग्णवाहिका चालकाचाही जीव वर-खाली! Ambulance
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

रुग्णवाहिका चालकाचाही जीव वर-खाली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमध्ये अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये पुणे शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे रुग्णाला घेऊन जाणे शक्य होते. पण, आता दहा किलोमीटरवरील रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाताना आमचं ‘ब्लड प्रेशर’ वाढलेलं असतं. सायरन वाजवा, हॉर्न वाजवा पण रस्त्यावरची गर्दी काही कमी होत नाही. रुग्णवाहिका चालक बबन जोंधळे बोलत होते.

अनलॉकनंतर आता सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी पुन्हा वाढली. या पार्श्वभूमिवर रुग्णवाहिका चालक जोंधळे यांच्याशी साधलेल्या संपर्कातून हे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोचण्यासाठी सध्या नेमका किती वेळ लागतो, याचा अभ्यास प्रकल्प सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य रुग्णालयाने केला.

प्रकल्पाचा उद्देश काय?

अपघात, पक्षाघात असो की हृदयविकाराचा झटका. या प्रत्येक आपत्कालीन परिस्थिती तातडीने रुग्णाला पहिल्या तासात प्रभावी उपचार मिळणे आवश्यक असते. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘गोल्डन अवर’ म्हणतात. शहरातील रस्त्यांवर गर्दी असल्याने बहुतांश वेळा रुग्णाला रुग्णवाहिकेनेही रुग्णालयात पोचण्यास वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाची गुंतागुंत वाढते किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यासाठी रुग्णालयाने हा अभ्यास केला.

कसा केला अभ्यास?

लोकमान्य रुग्णालयापासून दहा १० किलोमीटर अंतरावरील पाषाण, शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूड आणि औंध या भागांमध्ये हा अभ्यास प्रकल्प राबविण्यात आला. या भागात सलग सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रुग्णवाहिका पाठविण्यात आली. ते दहा किलोमीटर जाऊन परत येण्यासाठी किती वेळ लागतो. याचे विश्लेषण करण्यात आले.

निष्कर्ष काय निघाला?

शहरातील बेशिस्त वाहतूक, रस्त्याच्या कडेला सुरू असलेली बांधकामे, रस्त्यावरील वाहनांची गर्दी या सगळ्यांमधून वाट काढत रुग्णालयापर्यंत पोचताना रुग्णवाहिकेच्या चालकाला अक्षरशः कसरत करावी लागते

शहरातील दहा किलोमीटर अंतर प्रवास करण्यासाठी गर्दीच्या वेळी रुग्णवाहिकेला ‘गोल्डन अवर’मध्ये पोचताना दमछाक झाली.

हेही वाचा: पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी

‘गोल्डन अवर’चे महत्त्व काय?

पक्षाघात असो की हृदयविकार. यात लक्षणे दिसल्यापासून तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. यात योग्य रुग्णालयात अचूक निदान आणि प्रभावी उपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते.

वाहन चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णवाहिका रुग्णालयात पोचण्यासाठी किती वेळ लागतो, हा एक या उपक्रमाचा भाग आहे. वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला जाण्यासाठी प्राधान्याने वाट मोकळी करून द्या, असा संदेश यातून देण्यात आला. रुग्णवाहिका लवकर रुग्णालयात पोचल्यास रुग्णावर तातडीने उपचार होऊ शकतील.

- डॉ. नरेंद्र वैद्य, व्यवस्थापकीय संचालक, लोकमान्य रुग्णालय

आपत्कालीन वैद्यकीय काळात रुग्णाला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोचण्यासाठी किती वेळ लागतो, हे पाहणे हा या अभ्यास प्रकल्पाचा उद्देश होता. त्यासाठी हे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. लोकांमध्ये जनजागृती करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे.

- डॉ. श्रीकृष्ण जोशी

रुग्णवाहिकेला प्रवासासाठी लागलेला सरासरी वेळ

1) सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य रुग्णालय ते औध - जाण्यासाठी लागलेला वेळ २८ मिनिटे आणि परत येण्यासाठी ३२ मिनिटे (संध्याकाळी चार वाजता)

2) लोकमान्य रुग्णालय ते डेक्कन - जाण्यासाठीचा वेळ ३३ मिनिटे आणि परत येण्यासाठी ३८ मिनिटे (सकाळी १०.१५ वाजता)

3) लोकमान्य रुग्णालय ते वनाज - जाण्यासाठी २९ मिनीटे आणि परत येण्यासाठी २८ मिनीटे (सकाळी ११.१५ वाजता)

4) लोकमान्य रुग्णालय ते मित्रमंडळ चौक - जाण्यासाठी ३५ मिनीटे आणि येण्यासाठी ४० मिनीटे (संध्याकाळी सहा वाजता)

5) लोकमान्य रुग्णालय ते शिवाजीनगर - जाण्यासाठी २२ मिनिटे आणि येण्यासाठी २८ मिनीटे (सकाळी सहा वाजता)

loading image
go to top