बारामतीतील कोरोनाबाधित महिलेला वाहनातून आणणारा चालक.... 

संतोष शेंडकर
Thursday, 21 May 2020

वडगाव निंबाळकर येथे मुंबईवरून आलेली एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. या महिलेला वाहनाद्वारे मुंबईतून वडगाव निंबाळकरपर्यंत आणणारा वाहनचालक बारामती येथे आरोग्य विभागाद्वारे क्वारंटाइन करण्यात आला होता.

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्‍यात करंजेपूल येथील कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेला एक रुग्ण निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमेश्‍वरनगर परिसराला दिलासा मिळाला आहे. 

अमोल कोल्हे यांना मारला सुप्रिया सुळे यांना टोमणा...  

वडगाव निंबाळकर येथे मुंबईवरून आलेली एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. या महिलेला वाहनाद्वारे मुंबईतून वडगाव निंबाळकरपर्यंत आणणारा वाहनचालक बारामती येथे आरोग्य विभागाद्वारे क्वारंटाइन करण्यात आला होता. त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. करंजेपूल ही परिसरातील पंधरा- वीस गावांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. मागील आठवडाभर पेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. आधीच मुर्टी येथे आढळलेला रुग्ण या पेठेत खरेदी करून गेल्याचे समजल्याने लोक धास्तावले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशात कोरोना संशयित चालक करंजेपूल येथेच मोठ्या सोसायटीत राहणारा होता. शिवाय त्याची पत्नी एका कंपनीमध्ये; तर त्याचा मुलगा एका किराणा दुकानांमध्ये काम करत होता. त्यामुळे सदर चालक पॉझिटिव्ह निघण्याच्या भीतीने परिसर अक्षरशः गॅसवर होता. करंजेपूल, वाणेवाडी या पेठ तीन- चार दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, सुदैवाने तो निगेटिव्ह आला. त्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आहे. या अहवालाने सोमेश्‍वरनगर परिसरात अद्याप एकही संशयित रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
दरम्यान, परिसरात पुणे- मुंबईहून आलेल्या नागरिकांनी चौदा दिवस घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक करत आहेत.

इथेच पंढरी अन् इथेच पांडुरंग 

करंजेपूल येथील संशयित रुग्ण निगेटिव्ह आला आहे. त्यास बारामती येथे सरकारी व्यवस्थेकडे क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected woman from baramati to be taken out of vehicle by drivers corona test negative