

Amol Mitkari Reaction Jayant Patil Fadnavis Meeting
esakal
Political Twist Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गेल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, "हा राजकारणातील नवा ट्विस्ट असून सध्या ही झोप उडवणारी बातमी आहे," असे म्हटले.