
बंगळूरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत झालेल्या CAA-NRC विरोधातील रॅलमध्ये अमुल्या नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. तिच्या या घोषणा देतानाच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होता. त्यानंतर तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, याच प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या फोटोसह पुण्यात टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकाजवळ एक आक्षेपार्ह फ्लेक्सट लावण्यात आला होता.
पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी लागलेले आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर, 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको....'असा शब्दांतील आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. हे पोस्टर पोलिसांनी तात्काळ हटविले होते. या पोस्टरचा फोटो निखिल पवार याने ट्विटरवर शेअर करत महाराष्ट्रात द्वेषाचे विष पसरू देऊ नका, असे म्हटले आहे. बेंगळुरूच्या एका सभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमुल्याचा फोटो वापरण्यात आला होता.
लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ
अमुल्याचा फोटो वापरला!
बंगळूरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत झालेल्या CAA-NRC विरोधातील रॅलमध्ये अमुल्या नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. तिच्या या घोषणा देतानाच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होता. त्यानंतर तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, याच प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या फोटोसह पुण्यात टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकाजवळ एक आक्षेपार्ह फ्लेक्सट लावण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत तत्काळ विश्रामबाग पोलिस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हा फ्लेक्सा काढून टाकला. संबंधित फ्लेक्सष कोणी लावला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. फ्लेक्स लावणारा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...
तत्परतेने पोस्टर उतरवले
ईशान्य दिल्लीत गेल्या आठवड्यात धार्मिक दंगल उसळली होती. या दंगलीत जवळपास 46 जणांचा बळी गेला असून 300वर जखमी आहेत. त्या परिसरात अजूनही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून अनेक द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पोलिस दक्षता घेत आहेत. त्यामुळंच पुणे पोलिसांनी तत्परतेने, हे वादग्रस्त पोस्टर उतरवले.