esakal | पुण्यातील कलाकारांकडून पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील कलाकारांकडून पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम

पुण्यातील कलाकारांकडून पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मयुर कॉलनी: सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण देशभरात सुरु आहे. पुण्यात देखील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. सध्या राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाचं भलं मोठं संकट समोर उभं असताना देखील पोलिस आणि इतर कोविड योद्धे जीवाची बाजी लावून काम करत आहेत. या कोरोना योद्ध्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पुण्यातील कलाकारंनी रस्त्यावर उतरून आभार मानले.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

नाकाबंदीसाठी आपल्या जीवाची बाजी लावून पोलिस व एस.पी.ओ कर्मचारी काम करतात म्हणून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कलाकारांनी एकत्र येऊन पोलिसांना सलाम करून आभार मानले. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पतळ्याशेजारी असलेल्या झोन ३ मध्ये नाकाबंदीच्या ठिकाणी कलाकार राहूल सोलापूरकर, आनंद इंगळे, माधव अभ्यंकर, अमेय वाघ, अपर्णा पेठे, सुरज जोशी, सखी गोखले, मृण्मयी देशपांडे, आश्विनी कुलकर्णी यांनी एकत्र येऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

संचार बंदी असताना देखील काही नागरिक विनाकारण वेगवेगळी कारणं सांगून रस्त्यावर फिरतात या नागरिकांना समजावून सांगण्याचे जिकिरीचे काम हे कर्मचारी करत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहवे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे राहूल सोलापूरकर यांनी सांगितले.

loading image
go to top