मुळशीकर गॅसवर, दिवसभरात सापडले कोरोनाचे २२ रुग्ण

धोंडिबा कुंभार
मंगळवार, 7 जुलै 2020

मुळशी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांनी कालच शंभरी ओलांडली होती. तालुक्यात काल नवीन १४ रुग्ण सापडले होते. आज

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे आणखी २२ रुग्ण सापडले. त्यामुळे आता तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३४ वर पोचली आहे. आजपर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ४१ रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. आज नवीन सापडलेल्या रुग्णांत आठ महिला व चौदा पुरुषांचा समावेश आहे. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

मुळशी तालुक्यात आज जांबे येथे एक, बावधनला दोन, पिरंगुटला दोन, हिंजवडीला तीन, नांदे येथे दोन, भूगावला दोन, सूस येथे दोन, उरवडे येथे एक, मारुंजीला एक,  नेरे येथे तीन,  हाडशी येथे दोन, तर माण येथे एक रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख चढताच राहिल्याने चिंता वाढली आहे. सलग केवळ सहा दिवसांत तालुक्यात सुमारे सत्तर रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरासरीने तालुक्यात रोज दहा रुग्णांची भर पडू लागली आहे.  

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

मुळशी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांनी कालच शंभरी ओलांडली होती. तालुक्यात काल नवीन १४ रुग्ण सापडले होते. काल सापडलेल्या चौदा जणांत नऊ पुरुष व पाच महिलांचा समावेश होता.  कोरोनाग्रस्तांची ही मालिका चिंता करणारी ठरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 22 corona patients grew in Mulshi taluka