पुणे विद्यापीठाचा आणखी एक करार; विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी!

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन आणि  सीफोरआयफोर या कंपनीशी करार केला आहे. करारानुसार औद्योगिक कंपन्या आपल्या क्षेत्रातील नवे प्रयोग , संशोधन 'इंडस्ट्री 4.0 एक्सपिरियन्स सेंटर' या प्रयोगशाळेमध्ये करणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी विद्यापीठाच्या प्राध्यापकांना येथे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याबरोबरच दरवर्षी 2 विद्यार्थ्यांना फेलोशिपच्या माध्यमातून या प्रयोगशाळेत कामही करता येणार आहे. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन आणि 'सीफोरआयफोर' (सेंटर फॉर इंडस्ट्री फोर. झीरो) या कंपनी बरोबर सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार पुणे विद्यापीठामध्ये 'इंडस्ट्री 4.0 एक्सपिरियन्स सेंटर' ही प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी यांना नवीन संशोधनात सहभाग घेता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, एसपीपीयू रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, उद्योजक राहुल किर्लोस्कर, सीफोरआयफोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. नवलगुंदकर, पुणे विद्यापीठाच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरच्या समन्वयक डॉ. पूजा दोशी,  सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.

एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन आणि  सीफोरआयफोर या कंपनीशी करार केला आहे. करारानुसार औद्योगिक कंपन्या आपल्या क्षेत्रातील नवे प्रयोग , संशोधन 'इंडस्ट्री 4.0 एक्सपिरियन्स सेंटर' या प्रयोगशाळेमध्ये करणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी विद्यापीठाच्या प्राध्यापकांना येथे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याबरोबरच दरवर्षी 2 विद्यार्थ्यांना फेलोशिपच्या माध्यमातून या प्रयोगशाळेत कामही करता येणार आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक; शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

कोरोनाच्या विषाणूमुळे विज्ञान तंत्रज्ञानातील विकास कार्यक्रमात काम करण्याची संधी निर्माण केली आहे. तसेच अभ्यास आणि उद्योगांमधील संशोधन एकत्र केल्याने औद्योगिकीकरणातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे शक्य होईल. या प्रयोगशाळेमुळे पुणे विद्यापीठात संशोधनासाठी आणखी एक दार उघडे झाले आहे. 

यावेळी उद्योजक राहुल किर्लोस्कर म्हणाले,  किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या परिसरात स्थापन करण्यात आलेली ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी पुणे विद्यापीठात स्थलांतरित करण्यात आली आहे. भारतात सध्या अशा चार प्रयोगशाळा असून त्यातील एक प्रयोगशाळा पुणे विद्यापीठात आहे."

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, 'इंडस्ट्री 4.0 हे येणाऱ्या काळातील महत्वाचे डिजिटल तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या अनेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापर करत आहेत. त्या माध्यमातून उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे काम या कंपन्यांचे अधिकारी/ कर्मचारी जगातून कुठूनही करू शकतात. या सामंजस्य करारानुसार पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून विद्यापीठाच्या पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमातील दोन विद्यार्थ्यांना या सेंटरतर्फे एक वर्षासाठी फेलोशिप दिली जाणार आहे. या फेलोशिपच्या आधारे ते विद्यार्थी या सेंटर मध्ये प्रत्यक्ष काम करू शकतील.

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another agreement of Pune University gives Opportunity for students to do research