नाझीरकर दांपत्यावर बारामतीत आणखी एक फसवणूकीचा गुन्हा

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल झालेले आहेत.
crime
crimeSakal Media

नाबारामती : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझिरकर व त्यांची पत्नी संगीता नाझीरकर यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बारामतीतील तीन आडतदारांच्या नावाच्या बनावट पावत्या एसीबीकडे सादर करत त्याद्वारे सुमारे आठ लाख 63 हजारांचे बनावट व्यवहार या दोघांनी दाखविले आहेत असा आरोप त्यांच्या विरोधात असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संदीप वसंतराव गदादे (रा. मळद, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.

crime
Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल झालेले आहेत. बारामतीत संजय वसंतराव गदादे व संदीप वसंतराव गदादे हे फळ व भाजीपाल्याचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु असून त्यानुसार विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचे हे प्रकरण आहे.

crime
नारायणगाव : गुटखा वाहतूकप्रकरणी दोन जणांना अटक

यासंबंधी एसीबीकडून चौकशी सुरु असताना बारामतीतील तीन आडतदारांकडील पावत्या नाझीरकर यांनी सादर केल्या होत्या. एसीबीकडून चौकशीकामी बोलावण्यात आल्यानंतर गदादे हे दोन महिन्यांपूर्वी पुणे कार्यालयात गेले. यावेळी सन 2012-13 या कालावधीत त्यांच्या आडत दुकानाच्या 38 बोगस पावत्या नाझीरकर यांनी एसीबीकडे सादर केल्याचे दिसून आले. या पावत्यांवर इंग्रजीत आकडे मांडलेले होते. शिवाय बाजार समितीचा कोणताही शिक्का नव्हता. आडत दुकानदारांच्या सह्या नव्हत्या. गदादे यांच्याकडे मिरची, काकडी, दोडका, फ्लाॅवर आदी 6 लाख 77 हजार रुपयांचा शेतमाल विक्री केल्याचे या पावत्यांवरून दाखविण्यात आले होते. परंतु नाझीरकर यांच्याकडून कोणताही शेतमाल गदादे यांनी खरेदी केलेला नाही. तसेच ते त्यांना ओळखतही नाहीत.

गदादे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात अधिक माहिती घेतली असता, बारामतीतील केशवराव बाबुराव मचाले आणि सुनील बबनराव बनकर या आडतदारांकडील अशाच बनावट पावत्या जोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यात या दोघांकडे सोयाबीन, शेवगा, वांगी विक्री केल्याचे तर दाखविण्यात आले होते. मचाले यांच्याकडील तीन पावत्यांवर 1 लाख 49 हजार 545 तर तर बनकर यांच्याकडील19 पावत्यांद्वारे 36, 477 रुपयांचा शेतमाल विकल्याचे दाखवण्यात आले होते. या तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी नाझीरकर दांपत्यावर गुन्हा दाखल केला.

crime
Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com