बारामतीत आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला

मिलिंद संगई 
Friday, 24 April 2020

बारामतीत एक कोरोनाग्रस्त सापडला असला तरी शहराची कोरोनाची परिस्थिती आता ब-यापैकी सुधारण्याच्या मार्गावर असून, नवीन सापडलेला रुग्ण वगळता केवळ एकच रुग्ण कोरोनामुक्त होणे बाकी आहे.

बारामती : तालुक्यातील माळेगाव येथील एक रुग्ण कोरोनाग्रस्त निघाल्याने आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आठवर जाऊन पोहोचली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला 16 एप्रिल रोजी डायलिसीस करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या वेळेस त्याला कोरोनाची कसलीही लक्षणे नव्हती, मात्र गुरूवारी (ता. 23) त्याला त्रास होऊ लागल्याने त्याच्या घशातील द्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; वाचा काय घडलं?

बारामतीत एकच रुग्ण कोरोनामुक्त होणे बाकी असताना आता पुन्हा एक कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. दरम्यान माळेगाव परिसराचा तीन किमीचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून, हा रुग्ण बारामतीतून पुण्याला जाताना त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, पुण्यात दाखल झाल्यानंतरच त्याला ही लक्षणे सुरु झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असल्याने कोरोनाची लागण नेमकी बारामतीत झाली की पुण्यात हा प्रश्न कायम आहे.

हा कोरोनाग्रस्त सापडला असला तरी शहराची कोरोनाची परिस्थिती आता ब-यापैकी सुधारण्याच्या मार्गावर असून, नवीन सापडलेला रुग्ण वगळता केवळ एकच रुग्ण कोरोनामुक्त होणे बाकी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

 'दूध हळद प्यायला लोकांना प्रोत्साहन द्या'; दूध संघाचं राज्य सरकारला आवाहन

बारामतीत प्रशासनाने लॉकडाउनसह इतरही अनेक उपाययोजना केल्यामुळे कोरोनाची साखळी काही अंशी मोडण्यात यश आल्याचे दिसत आहे. ज्या भाजीविक्रेत्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्याच्या घरातील दोन छोटया मुली, त्याचा मुलगा व सून असे चौघेही कोरोनामुक्त झाले असून, त्यांना पुण्यातून डिसचार्ज देण्यात आला आहे, आता ते बारामतीतील घरात होम कोरोटांईन असतील, असेही खोमणे यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another coronary patient was found in Baramati