esakal | दारू विक्री करू देण्यासाठी मागितले एपीआयने पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

दारू विक्री करू देण्यासाठी मागितले एपीआयने पैसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तब्बल सहा वर्षानंतर चंद्रपूरातील दारूबंदी हटली. यामुळे तळीराम जाम खुष आहेत.पण दारूबंदी असतांना होत असलेली भ्रष्ट पोलीसाची कमाई पुरती बंद झाली आहे.यामुळे त्यांच्यात कमालीची नाराजी आहे.गावात दारूविक्री करण्यासाठी आता ते हप्ते मागू लागले आहेत.असाच प्रकार करणया एका एपीआयसह पोलीसाला लाचलुचपत विभागाच्या जाळयात सापडले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस (Police) स्टेशन मध्ये हा प्रकार काल सायंकाळच्या सुमारास समोर आला.

एपीआय मिलींद पारडकर व पोलीस संजू रतनकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीसांची नावे आहेत.लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत राज्याच्या सिमेवरील गावे मोडतात.लाठी लगत असलेल्या तोहोगावात शासनमान्य देशी दारूचे दुकान आहे.दरम्यान परिसरात लोक अवैध दारूविक्री करतात.एपीआय मिलींद पारडकर यांनी नुकताच लाठी पोलीस स्टेशनचा चार्ज आपल्या हाती घेतला.दारू विकी्र सुरू ठेवायची असेल तर दरमहा अठरा हजार रूपये दयावे लागतील.सोबतच मागील रक्कम असे एकून 36 हजार रूपयाची मागणी त्यांनी केली.दरम्यान तक्रारकत्र्यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती.याप्रकरणाची तक्रार एसीबी कडे दिल्यांनतर 29 हजार पाचशे रूपयाची लाच घेतानंा एपीआय पारडकर व पोलीस रतनकर यांना रंगेहाथ पकडयात आले.सदर कार्यवाही पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: Mumbai : सेन्सेक्स 60 हजार निफ्टी 18 हजार

महिनाभरापुर्वीच झाले होते रूजू

मिलींद पारडकर हे साधारणत एक महिन्यापुर्वी लाठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रूजू झाले होते.दारूबंदी असतांना लाठी पोलीस स्टेशन मलाईदार म्हणून ओळखले जायचे.पण दारूबंदी उठल्यानंतर येथील पोलीसांची कमाई बंद झाली.अशातच लहानसहान दारू विक्रेत्याकडून हप्ता घेण्याचा प्रकार सुरू झाला होता.

हेही वाचा: कोरोनाचा 'ताप' ओसरला, 24 तासांत देशभरात 14 हजार रुग्णांची नोंद

नागरिकांशी सुसंवाद नाही

ठाणेदार मिलींद पारडकर यांचा नागरिकांशी सुसंवाद नव्हता.सकमुर येथे अवैध दारूविक्री करणायावर कार्यवाहीसाठी ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला.तो ठराव ठाणेदारांना देत दारूविक्री बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.पण ठाणेदार पारडकरांनी याकडे पुरते दुर्लक्ष करित पैसे कमविण्याच्या भानगडीत पडले होते.

loading image
go to top